Accident (फोटो सौजन्य - ANI)

Panchkula Road Accident: हरियाणातील पंचकुला येथील पिंजोर येथे आज सकाळी सोलन-शिमला बायपासवर अतिशय वेगाने जाणारी एक कार रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला धडकली. धडकेच्या तीव्रतेमुळे 4 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिस पथक घटनास्थळी पोहोचले, त्यांनी मृतांचे मृतदेह बाहेर काढले आणि शवविच्छेदनासाठी पाठवले.पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही घटना पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास घडली. पंचकुलातील पिंजोर येथे सोलन-शिमला बायपासवर परमाणूहून येणारी एक कार कालका बितना कॉलनीजवळ रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला धडकली. गाडीचा टायर फुटल्यामुळे हा अपघात झाला असावा, असेही पोलिसांनी सांगितले. सध्या चौकशीनंतरच काही सांगता येईल. या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये गाडीचा किती भीषण अपघात झाला आहे ते दिसून येत आहे.

येथे पाहा व्हिडीओ:  

पंचकुला येथे भीषण रस्ता अपघात मृतांची नावे अपघातानंतर पोलिसांनी अभ्यास बन्सल, अदीप, चिराग मलिक आणि वैभव यादव अशी मृत्युमुखी पडलेल्या तरुणांची ओळख पटवली. ते सर्व एकमेकांचे मित्र असल्याचे सांगितले जाते. अपघाताची बातमी मिळताच मृतांच्या कुटुंबियांमध्ये शोककाळ पसरली आहे.