Himachal Pradesh: इमारत कोसळून 6 जवानांचा तर एका नागरिकाचा मृत्यू
हिमाचल प्रदेश: इमारत कोसळली (फोटो सौजन्य-ANI)

हिमाचल प्रदेशात (Himachal Pradesh) रविवारी (14 जुलै) सोलन या ठिकाणी तीन मजली इमारत कोसळल्याची दुर्घटना घडली. या दुर्घनेत आता पर्यंत 6 जवानांसह एका नागरिकाचा मृत्यू झाला आहे. तर अन्य 7 जणांना इमारतीच्या ढिगाऱ्याखालून सुखरुप वाचवण्यात आले आहे.

कुम्हारहट्टी येथे काही जवान इमारतीच्या धाब्यावर जेवणासाठी थांबले होते. राज्यात सातत्याने पडत असलेल्या मुसळधार पावसाचा इमारतीच्या भागावर परिणाम होऊन खचली होती. पावसाचा जोर वाढताच इमारत कोसळून खाली पडली. इमारत कोसळल्याची दुर्घटन कळताच तातडीने बचाव पथक आणि स्थानिक प्रशासाने बचावकार्य सुरु केले.

(Himachal Pradesh: पावसामुळे 3 मजली इमारत कोसळली; 23 जणांचा वाचवण्यात यश, अजून 12 जण अडकल्याची भीती)

त्याचसोबत सोलनचे उपायुक्त के. सी. चमन यांनी दुर्घटनास्थळी भेट दिली. तर 17 जवांनांची सुटका करण्यात आली असून दुर्घटनेत 6 जवान आणि एका नागरिकाचा मृत्यू झाला आहे. परंतु अद्याप 7 जवान इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.