कोरोनाच्या (Coronavirus) वाढत्या प्रादुर्भावाचा हज यात्रेवरही (Haj 2021) मोठा परिणाम झाल्याचे दिसत आहे. भारतात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. याचपार्श्वभूमीवर यावर्षी हज यात्रेसंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. भारतातील हज समिती एसएसआयने (HSI) म्हटले आहे की, ज्या लोकांनी कोरोना लसीकरणाचे दोन्ही डोस घेतले आहेत, त्यांनाच हज यात्रेला जाण्यास परवानगी देण्यात आली आहे. कोरोनामुळे गेल्यावर्षी साऊदी सरकारने विदेशातील लोकांना हज यात्रेला येण्यास बंदी घातली होती.
सौदीचे आरोग्य मंत्रालय आणि जेद्दह येथील भारतीय वाणिज्य दूतावास यांच्या ताज्या सूचनांनंतर एचसीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी मकसूद अहमद खान यांनी गुरुवारी रात्री उशिरा ही घोषणा केली आहे. तसेच हज 2021 साठी ज्या लोकांनी पहिला डोस घेण्याचा अर्ज केला होता. दरम्यान, हज यात्रेला जणाऱ्या भारतीय मुस्लीम समुदायासाठी जून महिन्यात उड्डाणे सुरु होणार आहेत. याशिवाय, हज यात्रेच्या दर्जाबाबत सौदी अरेबियाच्या अधिकाऱ्यांनी अद्याप कोणतीही अधिकृत चर्चा केली नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. हे देखील वाचा- Ramzan 2021 Moon Sighting in India, Pakistan, Bangladesh, UK and Other Countries Live News Updates: पाकिस्तान आणि बांगलादेशातमध्येही चंद्रदर्शन झाल्याचे वृत्त नाही
हज यात्रेदरम्यान कोव्हीड19 च्या मार्गदर्शक सुचनाचे पालन करणे सक्तीचे आहे. येत्या 26 जूनपासून हज यात्रेकरूंना सौदी अरेबियाला जाण्याचा प्रवास सुरु होणार आहे. तर, सौदीला जाण्यासाठी 13 जुलै ही अंतिम तारिख असणार आहे. तसेच त्याचबरोबर, 14 ऑगस्टपासून परतीचा प्रवास सुरु होणार होईल. कोरोनामुळे हज 2020 वर जाऊ न शकलेल्या 1 लाख 23 हजार लोकांचे 2100 कोटी रुपये कोणत्याही कपातीशिवाय परत करण्यात आले होते. त्याचवेळी, सौदी अरेबियाच्या सरकारने 2018-19 साठी हज यात्रेकरूंच्या वाहतुकीसाठी सुमारे 100 कोटी रुपये परत केले होते. दरवर्षी हजसाठी सरासरी सुमारे 2 लाख लोक सौदी अरेबियात जातात.