Gujarat Shocker: सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असलेली उद्योजक विभूती पटेल उर्फ राणी बा हीच्यावर कर्मचाऱ्याला मारहाण आणि अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुजरात येथील मोरबी भागातील आहे, विभूती पटेल हीच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. विभूतीच्या कंपनीत काम करणाऱ्या तरुणाला नोकरीवरून काढून टाकल्यानंतर त्यानं तिच्याकडू १५ दिवसाचे थकबाकी पगार मागितला असताना तीनं हे कृत्य केल आहे. रागाच्या भरात सहाकाऱ्यांसह दलित तरुणाला बेल्टने मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, निलेश किशोरभाई दलसानिया असं पीडीत तरुणाचे नाव आहे. नीलेशने या प्रकरणात पोलिसांना तक्रार दिली. विभूती पटेलने केवळ मारहाणच केली नाही तर बुट चाटण्यास देखील भाग पाडले आहे. त्यानंतर पीडितेने विभुती पटेल हिच्या विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी विभूती पटेल यांच्यावर गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे.
मोरबी पोलिस ठाण्यात विभुती पटेलसह सहाजणांविरुध्दात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय दंड संहितांच्या कलमानुसार 323, 504, 506 असे कलम लागून गुन्हा दाखल केला आहे. धक्कादायक म्हणजे घटनेनंतर विभुती पटेल आणि तिचे साथीदार फरार असल्याची माहिती समोर येत आहे. पीडित निलेश सद्या रुग्णालयात आहे त्यावरा उपचार सुरु आहे. या घटनेनंतर शहरात एकच खळबळ उडाली आहे.