Ghaziabad Viral Video: पोलिसांपासून वाचण्यासाठी I20 ड्रायव्हरने रिव्हर्स गियरमध्ये चालवली गाडी, पोलिसही वैतागले; थरारक व्हिडिओ व्हायरल
Ghaziabad Viral Video (Photo Credit - X)

Ghaziabad: उत्तर प्रदेशातील गाझियाबाद (Ghaziabad) येथून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. काल रात्री उशिरा येथील एलिव्हेटेड रोडवर पोलिसांचे वाहन आणि कार यांच्यात घडलेला प्रकार पाहून सर्वांनाच धक्का बसला. येथे पोलिसांची गाडी i20 कारच्या मागे धावत होती. मात्र पोलिसांपासून वाचण्यासाठी कारस्वारही आपली कार रिव्हर्स गिअरमध्ये चालवत होता. पोलिस वाहन आणि कार चालकाला पकडण्याचा प्रयत्न करत होते. मात्र कार चालकाने भरधाव वेगात आपली कार बॅक गिअरमध्ये चालवली. पोलिसांची गाडी सुमारे 2 किलोमीटर धावत राहिली आणि गाडी बॅक गियरमध्ये धावत राहिली. (हे देखील वाचा: Indore Shocker: पार्टनरच्या सांगण्यावरून तरुणाने केले Sex Change Operation; नंतर प्रियकराचा लग्न करण्यास नकार, गुन्हा दाखल)

पाहा व्हिडिओ

कार चालक बेदरकारपणे चालवत होता गाडी 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एलिव्हेटेडवर तैनात असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना तेथून जाणाऱ्या कार स्वारांनी माहिती दिली की I-20 कारचा चालक अतिशय बेशिस्तपणे गाडी चालवत आहे. ज्यामध्ये दारू पिऊन गाडी चालवल्याची तक्रार होती. माहिती मिळताच पोलीस सक्रिय झाले आणि त्यांनी गाडी थांबविण्याचा प्रयत्न केला.

रस्त्यावरून जाणारी इतर वाहनेही अपघातातून बचावली

यावेळी पोलिसांनी कारस्वाराला थांबवण्याचा प्रयत्न केला असता, कारचालकाने पोलिसांपासून वाचण्यासाठी कार बॅक गिअरमध्ये चालवण्यास सुरुवात केली. पोलिसांच्या वाहनांनी सुमारे 2 किलोमीटरपर्यंत कारस्वाराचा पाठलाग केला. पण कारस्वार मागच्या गिअरमध्ये वेगाने कार चालवत होता. यावेळी रस्त्यावरून जाणारी इतर वाहनेही अपघातातून बचावली. या घटनेबाबत अधिक माहिती घेतली जात असून तपासानंतर आवश्यक ती कारवाई केली जाईल असे पोलिसांनी सांगितले