Full Emergency at Thiruvananthapuram International Airport: कालिकतहून दमामला (Dammam) जाणारे एअर इंडिया एक्सप्रेसचे विमान (Air India Express Flight) तांत्रिक कारणामुळे तिरुअनंतपुरमला (Thiruvananthapuram) वळवण्यात आले आहे. या फ्लाइटमध्ये 168 प्रवासी होते. एअरलाइनच्या प्रवक्त्याने ही माहिती दिली आहे. सध्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे.
हायड्रॉलिक बिघाड झाल्यामुळे कालिकतहून दमामला जाणारे विमान राज्याच्या राजधानीकडे वळवण्यात आल्यानंतर शुक्रवारी येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर संपूर्ण आणीबाणी घोषित करण्यात आली. वास्तविक हे विमान केरळमधील कालिकतहून सौदी अरेबियातील दम्मामला जाणार होते. (हेही वाचा - Goods Train Derailed In Bihar: बिहारमध्ये करबंदिया रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वेचे 13 डबे रुळावरुन घसरले)
एअर इंडिया एक्स्प्रेसनुसार, रात्री 12.15 वाजता विमान तिरुअनंतपुरम येथे उतरणार होते. या फ्लाइटमध्ये क्रू मेंबर्ससह 182 लोक होते. एअर इंडिया एक्सप्रेस IX 385 फ्लाइटचा मागचा भाग टेक ऑफ दरम्यान धावपट्टीवर आदळल्याचे सांगण्यात येत आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षित लँडिंगसाठी विमान अरबी समुद्रात इंधन भरल्यानंतर विमानतळावर उतरले. विमानतळ व्यवस्थापनाने संपूर्ण आणीबाणी घोषित केली आहे.
#WATCH | Dammam bound Air India Express flight from Calicut diverted to Thiruvananthapuram due to technical reasons lands safely at the airport. A full emergency was declared at the Thiruvananthapuram airport for the landing of this flight pic.twitter.com/22EunuU0n5
— ANI (@ANI) February 24, 2023
विमानाने सुरक्षित लँडिंग केल्यानंतर सर्व प्रवाशांना खाली उतरवण्यात आल्याची माहिती एअर इंडिया एक्स्प्रेसकडून देण्यात आली. विमान कंपनी आता प्रवाशांना पर्यायी विमानाने दम्मामला पाठवण्याची व्यवस्था करत आहे. हे विमान तिरुअनंतपुरम येथून आज दुपारी 3.30 वाजता उड्डाण करेल.