First FIR Under Bharatiya Nyaya Sanhita: सीबीआय (CBI) ने दोन दिल्ली पोलिस कर्मचाऱ्यांविरुद्ध (Delhi Police Personnel) नवीन भारतीय न्यायिक संहिते (Bharatiya Nyaya Sanhita) अंतर्गत पहिला एफआयआर (FIR) नोंदवला आहे. केंद्रीय एजन्सीने गुरुवारी सांगितले की, तिहार तुरुंगात बंद असलेल्या एका व्यक्तीच्या सुटकेसाठी मदत करण्यासाठी 10 लाख रुपयांची लाच मागितल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्यायिक संहितेने ब्रिटिश काळातील भारतीय दंड संहिता (IPC) ची जागा घेतली आहे.
सीबीआयने सांगितले की, बुधवारी संध्याकाळी नार्कोटिक्स सेल, मॉरिस नगर, दिल्ली येथे तैनात हेड कॉन्स्टेबल रवींद्र ढाका आणि परवीन सैनी यांच्या विरोधात गुन्हेगारी कट रचण्याच्या नवीन कायद्याच्या 61 (2) अन्वये आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या तरतुदीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. (हेही वाचा -New Criminal Laws Take Effect Today: नवीन फौजदारी कायदे देशभरात आजपासून लागू; कायदेतज्ज्ञांकडून संमिश्र प्रतिक्रिया, आव्हानांचे संकेत)
CBI registers its first FIR under Bharatiya Nyaya Sanhita
Edited video is available on PTI Videos (https://t.co/L2D7HH309u) #PTINewsAlerts #PTIVideos @PTI_News pic.twitter.com/x12BJ7pS9M
— PTI News Alerts (@PTI_NewsAlerts) July 4, 2024
प्राप्त माहितीनुसार, तिहार तुरुंगात बंद असलेल्या फिर्यादीच्या भावाच्या सुटकेसाठी मदत करण्यासाठी आरोपी पोलिस कर्मचाऱ्यांनी 10 लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. वास्तविक, तुरुंगात असलेल्या व्यक्तीकडून एनआरएक्स ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. पीडित तक्रारदाराने सीबीआयला सांगितले की, त्याचा भाऊ कोशिंदर याला औषधे चुकीच्या पद्धतीने दाखविण्यात आली. तसेच रवींद्र ढाका आणि परवीन सैनी यांनी तक्रारदाराला बनावट बिले तयार करून सक्षम न्यायालयासमोर सादर करण्यासाठी एनआरएक्स औषधांची माहिती देण्यासाठी लाच मागितल्याचा आरोप सीबीआयने केला आहे.