Photo Credit- X

Tirupati Fire: आंध्र प्रदेशातील तिरुमला (Tirumala Venkateswara Temple)लाडू काउंटरवर आग लागल्याची घटना घडली. आग पसरताच भाविकांनी घाबरून तेथून पळ काढला. उपस्थित कर्मचाऱ्यांनी तातडीने आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. आगीत मोठे नुकसान होण्यापूर्वीच ती आटोक्यात आणली. काउंटर क्रमांक 47 वरील सेटअपला जोडलेल्या पॉवर सप्लाय (यूपीएस) सिस्टममध्ये शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे सांगितले जात आहे. (Tirupati Stampede Update: आंध्र प्रदेशातील तिरुपती मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत 6 जणांचा मृत्यू, मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू देणार घटनास्थळास भेट)

8 जानेवारी रोजी तिरुपती येथील वैकुंठ द्वार दर्शन तिकीट केंद्राजवळ झालेल्या दुःखद चेंगराचेंगरीच्या काही दिवसांनंतर ही घटना घडली आहे, ज्यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला होता आणि अनेक जण जखमी झाले होते.

तिरुपती मंदिरात आगीची दुर्घटना

टोकनसाठी 4 हजार हून अधिक भाविकांच्या उपस्थितीत ही चेंगराचेंगरी झाली. या घटनेनंतर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आणि जखमींना मदत करण्याचे आदेश दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मृतांच्या कुटुंबियांबद्दल संवेदना व्यक्त केल्या. चंद्राबाबू नायडू यांनी मृतांच्या कुटुंबियांना 25 लाख रुपयांची भरपाई जाहीर केली.

बाधित कुटुंबियांना कंत्राटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर या घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत आणि अनेक अधिकाऱ्यांना निलंबित किंवा बदली करण्यात आली आहे.