Rewa Road Accident: मध्य प्रदेशातील रीवा (Rewa) जिल्ह्यातील सोहागी डोंगरावर रात्री उशिरा भीषण रस्ता अपघात (Accident) झाला. 3 वाहनांच्या भीषण अपघातात 15 मजुरांचा मृत्यू झाला आहे, तर 40 जण जखमी झाले आहेत. एमपी-यूपी सीमेला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग 30 वर हा अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच सोहागी पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि पोलिसांनी बचाव मोहीम राबवून बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढले. अपघातात जखमी झालेल्यांना तूंतर सिव्हिल हॉस्पिटल तसेच रीवा येथील संजय गांधी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
ही संपूर्ण घटना शुक्रवारी रात्रीची आहे. बस जबलपूरहून रेवामार्गे प्रयागराजला जात होती. दिवाळी साजरी करण्यासाठी सिकंदराबादहून बसमध्ये चढून प्रवासी लखनौमध्ये त्यांच्या घरी जात होते, असे सांगण्यात येत आहे. दरम्यान, पहिली प्रवासी बस कटनीला पोहोचली. कटनी ते लखनौ या बसमध्ये अधिक प्रवासी भरले होते. यानंतर ही बस प्रवाशांसह उत्तर प्रदेशातील लखनौला रवाना झाली. बस रेवाच्या सोहागी डोंगरावर येताच तिचे नियंत्रण सुटले आणि ट्रकला धडकली. ट्रक गिट्टीने भरलेला होता. धडक होताच बस पलटी झाली. यादरम्यान बसच्या बोनेटवर आणि पुढील सीटवर बसलेल्या सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला. (हेही वाचा - Platform Ticket Fare: मुंबईमधील महत्वाच्या स्थानकांवरील प्लॅटफॉर्म तिकिटाचे दर झाले 50 रुपये; स्टेशन्सवरील गर्दी टाळण्यासाठी Central Railway ची युक्ती)
बसमध्ये 100 हून अधिक प्रवासी असल्याची माहिती मिळत आहे. प्रत्यक्षात बस सोहागी डोंगराजवळ येताच बसच्या पुढे जाणाऱ्या ट्रकला अज्ञात वाहनाने धडक दिली. यादरम्यान बस अनियंत्रित होऊन ट्रकच्या मागच्या बाजूला जाऊन पलटी झाली. ट्रकला धडकलेल्या वाहनाचा चालक वाहनासह घटनास्थळावरून बेपत्ता आहे. या घटनेपासून पोलीस या संपूर्ण घटनेचा तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांमधील सर्व प्रवासी उत्तर प्रदेश, बिहार आणि नेपाळमधील रहिवासी आहेत, ज्यांचे प्रशासकीय पथक त्यांच्या कुटुंबीयांना माहिती देण्यासाठी त्यांचा शोध घेत आहे.
घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. पोलिसांचे पथकही घटनास्थळी पोहोचले आणि बचावकार्य हाती घेतले. जिल्हाधिकारी मनोज पुष्प, एसपी नवनीत भसीन यांच्यासह सर्व प्रशासकीय अधिकारीही घटनास्थळी पोहोचले.