Baramulla Encounter: उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील (Baramulla District) वानसेरान तारीपोरा भागातील वरच्या जंगलात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू आहे. दहशतवाद्यांनी अचानक केलेल्या गोळीबारात लष्कराचा एक जवान जखमी झाला. या जवानाला जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दोन्ही बाजूंनी अजूनही गोळीबार सुरू आहे.
चकमक सुरू झाल्याची पुष्टी करताना पोलिसांनी सांगितले की, जेव्हा एसओजी आणि लष्कराचे जवान वनसेरन तारीपोरा येथील वरच्या भागात असलेल्या सुलतानपुराच्या जंगलात शोध मोहीम राबवत होते, तेव्हा दहशतवाद्यांना दिसल्यानंतर दहशतवादी मागे लपले. सैनिकांना जवळ येताना पाहून त्यांनी त्यांच्यावर गोळीबार सुरू केला. अचानक झालेल्या या गोळीबारात दहशतवाद्यांची एक गोळी लष्कराच्या जवानाच्या पायात लागली आणि तो तिथेच पडला. (हेही वाचा - Uttar Pradesh Shocker: किरकोळ वादानंतर पत्नीने केला गळफास घेण्याचा प्रयत्न; बायकोला वाचवण्याऐवजी नवऱ्याने बनवला लाइव्ह व्हिडिओ)
त्यानंतर सुरक्षा दलांनी प्रत्युत्तर गोळीबार सुरू केला. दरम्यान, सुरक्षा दलाने जखमी जवानाला तेथून बाहेर काढले आणि जवळच्या रुग्णालयात नेऊन उपचार केले. सध्या तो सुरक्षित आहे. त्याचवेळी सुलतानपूरच्या जंगलात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये अधूनमधून गोळीबार सुरू आहे. घनदाट जंगलाच्या मध्यभागी सुरक्षा जवान दहशतवाद्यांना घेरण्याचा प्रयत्न करत आहेत.
J&K | Encounter started at Wanseeran Taripora area of Baramulla. Police and security forces are on the job. Further details shall follow: Police
— ANI (@ANI) October 26, 2022
दहशतवाद्यांना पूर्णपणे घेरण्यासाठी इतर उपकरणांसह अतिरिक्त तुकड्या मागवण्यात आल्या आहेत. घनदाट जंगलामुळे दहशतवाद्यांचे नेमके ठिकाण कळू शकलेले नाही. अंदाजानुसार, जंगलात दोन ते तीन दहशतवादी असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. संध्याकाळपूर्वी या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी सुरक्षा दल सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. या चकमकीदरम्यान हे दहशतवादी कोणत्या संघटनेशी संबंधित आहेत आणि ते स्थानिक आहेत की नाही, हे शोधण्याचाही प्रयत्न सुरू आहे.