Election Commission of India | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

Election Commission of India: भारतीय निवडणूक आयोग (Election Commission of India)कडून नुकती एक माहिती समोर आली आहे. ज्यात गेल्या दोन महिन्या निवडणूक आयोगाने 425 तक्रारी (complaints) दाखल झाल्याचे सागंण्यात आले आहे. त्या एकूण तक्रारींपैकी निवडणूक आयोगाने 90% तक्रारींचे निराकरण केले आहे. गेल्या दोन महिन्यांतील हा आकडा असून एएनआय या वृतसंस्थेने त्याला दुजोरा दिला आहे. त्याशिवाय दाखल झालेल्या सर्व तक्रारी या हिंसामुक्त, कमी गोंगाट, कमी गोंधळ, प्रलोभने आणि दिखाऊपणापासून मुक्त असल्याने त्याचे समाधान असल्याचे आयोगाने म्हटले आहे. (हेही वाचा:Election Commission: भाजपने मुस्लिम आरक्षणाबाबत शेअर केलेला व्हिडिओ हटवा, केंद्रीय निवडणूक आयोगाचे X ला निर्देश )

पारदर्शकता आणि प्रकटीकरणाचा उपाय म्हणून, भारतीय निवडणूक आयोगाने GE 2024 मध्ये एमसीसी (MCC) च्या दोन महिन्यांच्या अंमलबजावणीचा दुसरा अहवाल जारी केला आहे. पहिला अहवाल 16 एप्रिल 2024 रोजी प्रसिद्ध झाला होता. त्यामुळे देशभरातून विविध राजकीय पक्षांकडून निवडणूक आयोगाला 425 तक्रारी दाखल झाल्याचे स्पष्ट झाले आहे.