UPSC NDA 2020 Admit Card: युपीएससी कडून  NDA, NA 2020 परीक्षांची अ‍ॅडमिट कार्ड्स रीलीज upsc.gov.in वरून अशी करा डाऊनलोड
Online Application | Photo Credits: Pixabay.com

युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन (UPSC) कडून यंदाच्या नॅशनल डिफेंस अकॅडमी (NDA)आणि नेवल अकॅडमी (NA)परीक्षा (I) आणि (II) 2020 ची अ‍ॅडमिट कार्ड्स रिलीज करण्यात आली आहेत. दरम्यान ज्या विद्यार्थ्यांनी यंदाच्या UPSC NDA examination साठी रजिस्टर केले आहे त्यांना युपीएससीच्या अधिकृत संकेतस्थळावर म्हणजेच upsc.gov.in वर 6 सप्टेंबर 2020 पर्यंत अ‍ॅडमीट कार्ड डाऊनलोड करता येणार आहे. यंदा युपीएससी च्या NDA 2020 आणि NA 2020 या परीक्षा 6 सप्टेंबर दिवशी होणार आहेत. त्यासाठी देशभर विविध परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना या परीक्षा देता येतील.

दरम्यान परीक्षा केंद्रावर पोहचल्यावर उमेदवाराकडे त्यांचे परीक्षांसाठी अ‍ॅडमिट कार्ड अत्यावश्यक आहे. मग पहा यंदा तुमचे अ‍ॅडमिड कार्ड डाऊनलोड कसे आणि कुठून कराल?

NDA 2020, NA 2020 चे अ‍ॅडमिट कार्ड डाऊनलोड कसे कराल?

  • upsconline.nic.in या युपीएससीच्या अधिकृत संकेतस्थळावर जा.
  • होमपेजवर तुम्हांला “e-Admit Cards for VARIOUS EXAMINATIONS OF UPSC” ही लिंक दिसेल त्यावर क्लिक करा.
  • तुमच्या डिस्प्ले स्क्रिन वर नवी विंडो ओपन होईल.
  • त्यानंतर UPSC NDA admit card चा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.
  • तुमचा रजिस्ट्रेशन नंबर, जन्म तारीख सारखे आवश्यक डिटेल्स भरा.
  • तुमचं अ‍ॅडमिट कार्ड दिसेल तिथे क्लिक करून डाऊनलोड करण्याचा पर्याय असेल.
  • अ‍ॅडमिट कार्ड डाऊनलोड करून घेतल्यानंतर त्याची प्रिंट कॉपी काढून ठेवा.

परीक्षेला जाताना ओरिजनल आणि ई स्वरूपातील अ‍ॅडमिट कार्ड दोन्ही घेऊन जाणं आवश्यक आहे. दरम्यान विद्यार्थ्यांना परीक्षेच्या पूर्वी 10 मिनिटं वर्गात प्रवेश दिला जाईल. एंट्री टाईम बंद झाल्यानंतर तुम्हांला परीक्षेच्या वर्गात प्रवेश नाकारला जाईल. दरम्यान यंदा कोरोनाच्या सावटाखाली ही परीक्षा होणार असल्याने आता वर्गात सोशल डिस्टंसिंग आणि वैयक्तिक काळजी घेणं आवश्यक आहे.