UPSC IES Mains Result 2019 : सोलापूरचा हर्षल भोसले याला देशात पहिला क्रमांक; upsc.gov.in वर 'असा' तपासून पहा निकाल
प्रातिनिधीक प्रतिमा | (Photo Credits: File Photo)

केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे (UPSC)  घेण्यात आलेल्या इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेस (IES) परीक्षेत सोलापूर (Solapur) जिल्ह्य़ातील मंगळवेढय़ाचा हर्षल भोसले (Harshal Bhosale) याने देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. जानेवारी 2019 रोजी केंद्रातील 551 जागांसाठी ही परीक्षा घेण्यात आली होती. ज्यांनंतर जून 2019 मध्ये लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या सप्टेंबर-ऑक्टोंबरमध्ये मुलाखती घेण्यात आल्या होत्या. अलीकडेच या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून संबंधित विद्यार्थ्यांना UPSC च्या संकेतस्थळावर म्हणजेच upsc.gov.in वर तपासून पाहता येणार आहे.

प्राप्त माहितीनुसार, या परीक्षेत सिव्हिल इंजिनीअर्स 161 , मेकॅनिकल इंजिनीअर्स 136 , इलेक्ट्रिक इंजिनीअर्स 108  वर इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन्स इंजीनियरिंग इंजिनीअर्स 106 जागांचा समावेश होता.यापैकी 494 जागांसाठी उमेदवारांची निवड करण्यात आली आहे.

असा तपासून पहा UPSC IES Mains Result 2019

1-upsc.gov.in  ही अधिकृत वेबसाईट सुरु करा.

2- UPSC IES Mains Result 2019 वर क्लिक करा

3- निकालाची पीडीएफ सुरु होईल.

4- तुमचा परीक्षा क्रमांक सर्च करून निकाल जाणून घ्या.

5- या निकालाची प्रत प्रिंट काढून सेव्ह करा.

दरम्यान, सोलापूर येथील हर्षलला पहिल्याच प्रयत्नात घवघवीत यश मिळाले आहे. हर्षल हा पाच वर्षांचा असतानाच वडिलांचे निधन झाले होते त्यानंतर आईने शेतीमध्ये कष्ट करत हर्षलचे शिक्षण पूर्ण केले. शालेय शिक्षण मंगळवेढय़ाच्या इंग्लिश स्कूल व देगावच्या आश्रमशाळेत पूर्ण झाले् होते. तर बीड येथील शासकीय तंत्रनिकेतनमधूुन त्याने इंजिनिअरिंग डिप्लोमा करून कराड येथून मेकॅनिकल इंजिनिअरिंगची डिग्री घेतली.

अलीकडेच मुंबईत भाभा अणुसंधान संशोधन संस्थेत नोकरी मिळाली होती. परंतु पुढचे ध्येय निश्चित असल्याने त्याने पुण्यात ऑईल अॅनन्ड नॅचरल गॅस कॉर्पोरेशनमध्ये सेवेत असतानाच त्याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अभियांत्रिकी परीक्षा दिली. आता यामध्ये यश संपादन करून त्याने देशात पहिला क्रमांक पटकावला आहे.