Representational Image (Photo Credits: Unsplash.com)

केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) कडून यंदाच्या सिव्हिल सर्व्हिस मुख्य परीक्षा ( Civil Services Mains) साठीचे अ‍ॅडमीड कार्ड ऑनलाईन (E-Admit Card) जाहीर करण्यात आले आहे. प्रिलिम्स परीक्षा पास होऊन मुख्य परीक्षेसाठी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी हे अ‍ॅडमीड कार्ड डाऊनलोड करू शकतात. केंद्रीय लोकसेवा आयोगाची वेबसाईट upsconline.nic.in वर ही ई अ‍ॅडमीट कार्ड्स उपलब्ध आहेत. दरम्यान यंदा कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर पेपर अ‍ॅडमीट कार्ड्स विद्यार्थ्यांना दिली जाणार नाहीत. त्याऐवजी ऑनलाईन हॉल तिकिट्स विद्यार्थ्यांना डाऊनलोड करून त्याची प्रिंट आऊट्स काढण्याचं आवाहन करण्यात आले आहे.

यंदा 8 ते 17 जानेवारी दरम्यान युपीएससीची मुख्य परीक्षा होणार आहे. त्यामुळे विद्यार्थी 17 जानेवारी पर्यंत ही ई अ‍ॅडमीड कार्ड्स डाऊनलोड करू शकतात.

युपीएससी मुख्य परीक्षेची हॉलतिकिट्स कशी डाऊनलोड कराल?

  • ई अ‍ॅडमिट कार्ड्ससाठी upsconline.nic.in या संकेतस्थळाला भेट द्या.
  • होम पेजवर तुम्हांला हॉल तिकिट्ससाठी एक लिंक फ्लॅश होताना दिसेल त्यावर क्लिक करा.
  • त्यानंतर तुम्ही नव्या विंडोवर रिडिरेक्ट व्हाल. तेथे तुमचे लॉगिंग डिटेल्स विचारले जाऊ शकतात.
  • ई अ‍ॅडमीट कार्ड डाऊनलोड करण्यासाठी तुम्हांला काही डिटेल्स भरावे लागतील यामध्ये रोल नंबर, बर्थ डेट यांचा समावेश असेल.
  • त्यानंतर UPSC Civil Services Mains Admit Card 2020 तुम्हांला दिसेल. ते डाऊनलोड करून नंतर त्याची प्रिंट आऊट देखील काढा.

इथे पहा UPSC Civil Services Mains Admit Card 2020 डाऊनलोड करण्याची डिरेक्ट लिंक!

यंदा युपीएससीची मुख्य परीक्षा 2 सत्रामध्ये होणार आहे. यात सकाळी 9 ते 12 आणि दुपारी 2 ते 5 ही वेळ असेल. युपीएससीची मुख्य परीक्षा लेखी परीक्षा असते. यामध्ये उत्तीर्ण विद्यार्थी पुढे मुलाखत राऊंड साठी बोलावले जातात. त्यांनंतर तिन्ही टप्प्यातील मार्कांची बेरीज करून अंतिम निकाल लावला जातो. सारे टप्पे पार करून बाहेर पडलेले गुणवंत विद्यार्थी पुढे रॅकिंगनुसार, IAS, IPS, IFS, IRS, आणि IRTS सेवेमध्ये रूजू केले जातात.