University Final Year Exams: अमिताभ बच्चन यांना कोरोना, राजभवनात सुद्धा COVID 19 पॉझिटिव्ह, HRD, UGC आता तरी परीक्षा रद्द करणार का? उदय सामंत यांचे ट्विट पहा
Uday Samant | (File Photo)

विद्यापीठ परीक्षांच्या (University Exams)  बाबत UGC आणि महाराष्ट्र सरकार (Maharashtra Government) मध्ये सुरु असलेल्या गोंधळात मागील काही दिवसांपासून विद्यार्थ्यांची मात्र परवड होत आहे. दुसरीकडे कोरोनाचा (Coronavirus) प्रसार मात्र झपाट्याने होत आहे, कालच अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांना कोरोनाची लागण झाल्याचे समजले, तसेच राजभवनात (Rajbhavan) सुद्धा 16 जण COVID 19 पॉझिटिव्ह आढळले याच पार्श्वभूमीवर आज उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी HRD, UGC आणि भूषण पटवर्धन (Bhushan Patvardhan)  यांना टार्गेट करत एक ट्विट केले आहे. जर कोरोना राजभवनासारख्या सुरक्षित ठिकाणी पोहचू शकतो तर अशा वेळी परीक्षा घेणं हे माझ्या विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणे आहे हे आता तरी HRD आणि UGC ला पटेल का? आणि याबाबत आता तरी भाषण पटवर्धन महाराष्ट्राची बाजू मांडतील का असे सवाल सामंत यांनी केले आहेत.

उदय सामंत यांनी अन्य एक ट्विट करत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना काळजी घेण्याचे सांगत आधार सुद्धा दर्शवला आहे तसेच अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन यांना सुद्धा लवकर बरे होण्यासाठी सदिच्छा दिल्या आहेत. MHT CET 2020: कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता पुढील सूचनेपर्यंत Common Entrance Test संबंधित सर्व परीक्षांना स्थगिती, उदय सामंत यांची माहिती

उदय सामंत ट्विट

Coronavirus In Maharashtra: महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात किती कोरोनाबाधित आहेत जाणून घ्या एका क्लिक वर (List Inside)

दरम्यान, कोरोना व्हायरस संकट काळात परीक्षा घेण्यास राज्य सरकार इच्छुक नाही. तरीही विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) या परीक्षा घ्याव्यात असे म्हणत असेल तर यूजीसीने परीक्षांबाबत गाईडलाईन्स जारी करावी, असे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी मागे सांगितले होते. सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंशी चर्चा करूनच हा निर्णय घेण्यात आला आहे असेही सामंत म्हणाले होते.