Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari. (Photo Credits: PTI)

Coronavirus Update: मुंबई येथील राजभवनात (Rajbhavan) एकूण 18 कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे, यानंतर राज्यापाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagatsingh Koshyari) यांना 14 दिवसांसाठी विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. मागील आठवड्यातच राजभवनातील 2 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण (COVID19 Test) झाल्याचे समजले होते त्यात शनिवारी आणखीन 14 जणांची भर पडली आहे. या रुग्णांमध्ये कोरोनाचे कोणतेही लक्षण नव्हते, आता त्यांना घरातच क्वारंटाईन करून ठेवण्यात आले आहे. यातील काही जणांनी खाजगीत कोरोना चाचणी केली होती, त्यामुळे सर्वात आधी बीएमसी (BMC) तर्फे त्यांची पुन्हा एकदा कोरोना चाचणी घेतली जाणार आहे.  Coronavirus In Maharashtra: महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात किती कोरोनाबाधित आहेत जाणून घ्या एका क्लिक वर (List Inside)

प्राप्त माहितीनुसार, कोरोनाची लागण झालेले 5 ते 6 वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी हे कोश्यारी यांच्या नेहमीच्या संपर्कातील असल्याने आता पाच दिवसांनी स्वतः कोश्यारी यांची सुद्धा कोरोना चाचणी घेण्यात येणार आहे.  सध्या राजभवनातील अन्य लोकांना तपासण्यासाठी इन-हाऊस डॉक्टर आणि पॅरामेडिक्सची एक टीम नियुक्त केली आहे. बाहेरील कोणत्याही व्यक्तीस पुढील काही काळासाठी राजभवन परिसरात प्रवेश नसेल तसेच काही दिवस कोणत्याही बैठका घेतल्या जाणार नाहीत.

ANI ट्विट

याच आठवड्यात, मंगळवारी राजभवनातील सर्वात प्रथम कोरोना पॉझिटिव्ह प्रकरण समोर आले होते, त्यानंतर 25 कर्मचार्‍यांना लगेचच क्वारंटाईन करण्यात आले. दुसऱ्याच दिवशी आणखीन एक कोरोना रुग्ण आढळल्याने अन्य 18  जणांना सुद्धा घरातच क्वारंटाईन केले गेले. शुक्रवारी, होम क्वारंटाईन अंतर्गत असलेल्या 43 कर्मचार्‍यांसह 100 कर्मचार्‍यांना आरटी-पीसीआर चाचणी घेण्यात आली होती. त्यातील 55 अहवाल समोर आले असून 14 रिपोर्ट्स पॉझिटिव्ह असल्याचे समजत आहे.

दरम्यान, बीएमसी तर्फे अजूनही राजभवन परिसर हा कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आलेला नाही. राजभवनात स्टाफ क्वार्टर हे मुख्य कार्यालय आणि राज्यपालांच्या निवासस्थानापासून वेगळे आहेत. संपूर्ण क्षेत्र मोठे असल्याने कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्याची आवश्यकता नाही. ज्या इमारतींमध्ये कर्मचार्‍यांनी सकारात्मक चाचणी घेतली त्या इमारतींना कंटेनमेंट झोन मध्ये मोडले जाईल ”असे बीएमसी तर्फे सांगण्यात आले आहे.