
National Testing Agency (NTA) कडून UGC NET Results ची तारीख जाहीर करण्यात आली आहे. 2025 च्या जून महिन्यात घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल आता 22 जुलै 2025 दिवशी जाहीर केला जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. निकालाच्या तारखेची माहिती एनटीए ने X वर पोस्ट करत दिली आहे. त्यामुळे आता UGC NETच्या विद्यार्थ्यांचे लक्ष निकालाकडे लागले आहे.निकालाच्या गुणांवर अर्जदारांना एकूण गुण, टक्केवारी गुण आणि JRF आणि/किंवा सहाय्यक प्राध्यापकपदासाठी पात्रता स्थिती याची माहिती मिळणार आहे. निकालांसह, एजन्सी अनेक विषय आणि श्रेणींसाठी कट-ऑफ गुण जाहीर करेल.
UGC NET June 2025 निकालाची तारीख
National Testing Agency will announce the result of UGC NET June 2025 cycle on 22nd July 2025.
— National Testing Agency (@NTA_Exams) July 17, 2025
UGC NET June Result 2025 ऑनलाईन कसा पहाल?
- ugcnet.nta.nic.in या अधिकृत वेबसाईट वर भेट द्या.
- होमपेज वर “UGC NET June 2025 Result” या लिंक वर क्लिक करा.
- Application Number, Date of Birth, आणि Security Pin टाकून तुमचे लॉगिन करा.
- आता स्क्रिनवर UGC NET scorecard 2025 दिसेल.
- निकालाची प्रत तुम्ही डाऊनलोड करून ठेवू शकता.
जून 2025 मध्ये देशभरातील वेगवेगळ्या ठिकाणी अनेक शिफ्टमध्ये Computer-Based Test (CBT) स्वरूपात ही परीक्षा घेतली जाते. नक्की वाचा: UGC NET June 2025 Exam Answer Key: यूजीसी नेट 2025 परीक्षेची उत्तरपत्रिका जाहीर.
विद्यापीठ अनुदान आयोग - राष्ट्रीय पात्रता परीक्षा (UGC NET) ही एक महत्त्वाची राष्ट्रीय पातळीवरील परीक्षा आहे जी भारतीय विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये सहाय्यक प्राध्यापक आणि कनिष्ठ संशोधन फेलोशिप (JRF) साठी पात्रतेचे मूल्यांकन करण्यासाठी वापरली जाते.