इयत्ता दहावी (SSC ), बारावी (HSC) परीक्षा दिलेल्या परंतू अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी संधी आहे. या परीक्षांमध्ये अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी पुरवणी परीक्षा (SSC, HSC Re Examination) घेण्यात येणार आहे. ही परीक्षा नोव्हेंबर-डिसेंबर 2020 मध्ये पार पडणार आहे. त्यासाठी राज्य मंडळाकडून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु करण्या आली आहे. ज्या विद्यार्थ्यांना पूरवणी परीक्षा द्यायची आहे अशा विद्यार्थ्यांनी 20 ते 29 ऑक्टोबर या काळात नियमीत शुल्कासह परीक्षा अर्ज भरायचे आहेत. ज्या विद्यार्थ्यांना या कालावधीत परीक्षा अर्ज भरता येणार नाहीत अशांना 30 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर 2020 या काळात विलंब शुल्क भरुन परीक्षा अर्ज करता येणार आहे, अशी माहिती राज्य मंडळ सचिवांनी दिली आहे.
दहावी, बरावी परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी राज्य मंडळाकडून घेण्यात येणारी घेण्यात येणारी परीक्षा राज्यात कोरोना व्हायस संसर्गाचे संकट असल्यामुळे होऊ शकली नव्हती. त्यामळे या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होण्याची संधी मिळावी या दृष्टीकोणातून ही परीक्षा घेतली जात आहे. त्यामुळे राज्य मंडळाकडून या परीक्षेसाठी अर्ज मागविण्यात येत असल्याची माहिती मंडळाने प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली आहे. (हेही वाचा, RRB NTPC 2020 CBT 1 Admit Card Update :आरआरबी एनटीपीसी केवळ एडमिट कार्ड ने परीक्षा हॉल मध्ये नाही मिळणार एंट्री)
दरम्यान, राज्य मंडळाच्या प्रसिद्धीपत्रकात दिलेल्या माहितीनुसार विद्यार्थ्यांना केवळ ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करता येणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांना श्रेणीसुधारणा करायची आहे, अशा विद्यार्थ्यांनाही अर्ज करता येणार आहे. मात्र, श्रेणीसुधारणेसाठी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना केवळ नोव्हेंबर-डिसेंबर 2020 आणि मार्च 2021 अशा सलग असलेल्या दोनच संधी मिळणार आहेत.
राज्य मंडळाने अधिक माहिती देताना म्हटले आहे की, विद्यार्थ्यांनी अर्ज भरल्यानंतर संबंधित शाळांनी दिलेल्या मुदतीत ऑनलाईन पैसे भरावेत. तसेच, भरलेल्या पैशांची पोचपावती आणि परीक्षार्थींची यादी विभागीय मंडळाला सादर करावी असे म्हटले आहे.