RRB NTPC 2020 CBT 1 Admit Card Update :आरआरबी एनटीपीसी केवळ एडमिट कार्ड ने परीक्षा हॉल मध्ये नाही मिळणार एंट्री; 'या' गोष्टी ही घेऊन जाव्या लागणार 

आरआरबी एनटीपीसी रेल्वे मध्ये नोकरीसाठी अर्ज केलेल्यांसाठी लवकरच एक आनंदाची बातमी मिळू शकते. रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड त्यांनी ठरवलेल्या तरखेनुसार परीक्षा घेण्याच्या तयारीत आहे. आरआरबी ने 15 डिसेंबर पासून सीबीटी 1 परीक्षेची घोषणा केली आहे. तर परीक्षा पार पडण्यापूर्वी 15 दिवस आधी एडमिट कार्ड जाहीर केलेजाणार आहे.  एडमिट कार्ड आल्यानंतर परीक्षेची फायनल वेळ, तारीख आणि सेंटर बाबत गोष्टी स्पष्ट होतील. परीक्षा हॉल मध्ये कोणत्याही प्रकारचे इलेक्ट्रॉनिक गैजेट्स घेऊन जाता येणार नाहीत.मोबाईल,पेजर,ब्लूटूथ डिवाईज,ईयर प्लग, इलेक्ट्रॉनिक घड्याळ हे सर्व घेऊन जाण्यासाठी परवानगी नाही. (Aadhaar Card माहिती UIDAI कडे सेफ आहे का? तुमची बायोमेट्रिक आणि इतर माहिती कशाप्रकारे ठेवली जाते सुरक्षित? जाणून घ्या)

भारतीय रेल्वे बोर्डाकडून एनटीपीसी सीबीटी-1 परीक्षेचे एडमिट कार्ड त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर पाहता येणार आहे. तेथूनच अर्ज केलेल्या उमेदवारांना ते डाऊनलोड ही करता येऊ शकते. डाऊनलोड करण्यासाठी उमेदवारांनी त्यांचा रजिस्ट्रेशन क्रमांक आणि जन्म तारीख देणे अनिवार्य असणार आहे. उमेदवारांनी हे सुद्धा लक्षात ठेवावे की त्यांना पोस्टा द्वारे ही एडमिट कार्ड पाठवले जाणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी वारंवार विभागाची अधिकृत वेबसाइट तपासून पहावी.

Exam

 

परीक्षाकर्ताला परीक्षा सेंटरला एडमिट कार्ड चे प्रिंट आउट तसेच पासपोर्ट साइज चा नवीन फोटो लावा. त्याचबरोबर ओरिजनल फोटो आइडेंटीकार्ड आणि त्याची कॉपी पण बरोबर घ्या. परीक्षेच्या दिवशी ई-कॉल लेटर बरोबर घेणे अनिवार्य आहे.त्याचबरोबर चालू असलेले फोटो ओळख पत्र घेऊन जाणे आवश्यक आहे. ओळख पत्राची केलळ कॉपी चालणार नाही. एडमिट कार्ड वर परीक्षाकर्ताचा फोटो,नाव , तारीख, वेळ या सगळ्याबाबींची माहीती असेल.