स्टाफ सिलेक्शन कमिशन कडून SSC CGL 2020 Results for Tier 2 जाहीर करण्यात आला आहे. 26 एप्रिल दिवशी हा निकाल जाहीर झाला असून SSC Combined Graduate Level 2020 Tier 2 Exam ला बसलेले विद्यार्थी आता त्यांचा निकाल पाहू शकतात. हा निकाल स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या अधिकृत वेबसाईट वर जाहीर करण्यात आला आहे. यंदा SSC CGL Tier 2 Exam ही जानेवारी 28,29 दिवशी झाली होती. आता त्याचा निकालही जाहीर झाला आहे.
SSC CGL 2020 Results कसा पहाल ऑनलाईन?
- स्टाफ सिलेक्शनची अधिकृत वेबसाईट ssc.nic.in ला भेट दया.
- होम पेजवरील Results tab वर क्लिक करा.
- आता एक नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये “Combined Graduate Level 2020 Tier 2 Results” या लिंक वर क्लिक करा.
- निकालाची यादी पीडीएफ स्वरूपात आहे तुमचा निकाल पाहण्यासाठी Ctrl+F दाबून सर्च बॉक्स मध्ये तुमचा रोल नंबर टाकून निकाल पहा.
Tier 2 Exam च्या निकालावर आता विद्यार्थी CGL 2020 Tier 3 Exam साठी पात्र होतात. ही परीक्षा फेब्रुवारी 6, 2022 ला घेण्यात आली आहे. टियर 2 साठी घोषित केलेल्या निकालांमध्ये त्यांच्या टियर 3 परीक्षेच्या मूल्यांकनासाठी निवडलेल्या उमेदवारांच्या यादीचा उल्लेख आहे. म्हणून, SSC CGL 2020 टियर 3 पेपरचे मूल्यमापन फक्त अशा उमेदवारांसाठी केले जाईल ज्यांनी SSC CGL 2020 टियर 2 परीक्षा उत्तीर्ण केली आहे आणि आयोगाने जारी केलेल्या यादीमध्ये त्यांचा उल्लेख आहे. हे देखील नक्की वाचा: MPSC Stenographer Recruitment 2022: दहावी पास उमेदवारांना नोकरीची संधी; 12 मे पूर्वी करा mpsconline.gov.in वर अर्ज .
SSC CGL 2020 Tier 2 Exam ची अंतिम उत्तरसूची 5 मे ला ssc.nic.in वर जाहीर केली जाईल. परिक्षा दिलेल्यांचे SSC CGL Tier 2 Scorecard 5 ते 26 मे 2022 पर्यंत उपलब्ध करून दिले जाणार आहे.