एमपीएससी कडून Stenographer, Steno-Typist पदांसाठी नोकरभरती जाहीर झाली आहे. एमपीएससीच्या नोटिफिकेशन नुसार, स्टेनोग्राफर हायर ग्रेड, स्टेनोग्राफर लोअर ग्रेड, स्टेनो टायपिस्ट मराठी, स्टेनो टायपिस्ट इंग्लिश या पदावर सरकारी नोकरीची संधी आहे. आज 22 एप्रिल पासून त्यासाठी अर्जप्रक्रिया सुरू झाली असून 12 मे पर्यंत तुम्ही अर्ज करू शकणार आहेत. एकूण 252 जागांवरील नोकरभरतीमध्ये 62 जागा या स्टेनोग्राफर हायर ग्रेड, 100 जागा स्टेनो ग्राफर लोअर ग्रेड, 52 जागा स्टेनो टायपिस्ट मराठी आणि 39 जागा स्टेनो टायपिस्ट इंग्लिश साठी असणार आहेत.
अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 12 मे 2022 आहे तर शुल्क सादर करण्याची अंतिम मुदत 14 मे 2022 आहे. दहावी पास असलेला आणि टाईपिंग येत असलेल्या उमेदवारालाही या नोकरीमध्ये अर्ज करता येणार आहे. उमेदवाराचे वय 18 ते 28 वर्ष असणं आवश्यक आहे. mpsconline.gov.in या अधिकृत वेबसाईटद्वारा अर्ज करता येणार आहे. हे देखील नक्की वाचा: SBI Recruitment 2022: एसबीआय मध्ये Specialist Cadre Officer साठी होणार नोकरभरती; sbi.co.in वर करा 4 मे पूर्वी अर्ज.
शैक्षणिक पात्रतेच्या निकषांमध्ये लघुलेखनाची गती 100 शब्द प्रति मिनिटं तर टायपिंगची गती 30-40 शब्द प्रति मिनिट असणं आवश्यक आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया सशुल्क असणार आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 294 तर मागासवर्गीयांना 294 रूपये भरावे लागणार आहेत.