ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डी. बी. पाटील (D.B. Patil) यांचे कोल्हापूर (Kolhapur) येथे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. ते 85 वर्षांचे होते. कोल्हापूरच्या सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील कृतिशील व्यक्तीमत्व अशी त्यांची ओळख होती. ते श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस आणि महाराष्ट्र हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे माजी मुख्याध्यापक होते. त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते. दादासाहेब बळवंत पाटील असे त्यांचे पूर्ण नाव होते.
डी. बी. पाटील हे कोल्हापूरच्या शिक्षण वर्तुळातील महत्त्वाचे व्यक्तिमत्व होते. कोल्हापूरच्ये शैक्षणिक वर्तुळात त्यांचा दबदबा होता. कोल्हापूर जिल्ह्यातील प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसचे ते प्रदीर्घकाळ अध्यक्ष होते. प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस हे बहुजन समाज शिक्षणसंस्था असल्याचे मानले जाते. (हेही वाचा, ज्येष्ठ रंगकर्मी अरुण काकडे यांचे निधन, वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास)
डी. बी. पाटील हे कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्षपद अनेक वर्षे सांभाळले होते. कोल्हापूरातील शैक्षणीक वर्तुळातील सकारात्मक आणि चांगल्या गोष्टींना पाटील यांनी नेहमीच प्राधान्य दिले. अमेरिकेत असलेल्या मुलासोबत चर्चा केल्यानंतर डी. बी. पाटील यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याबाबत आज निर्णय घेतला जाणार आहे.