जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. कारण इंडियन कोस्ट गार्ड मध्ये 'नाविक' (Navik) पदासाठी नोकर भरती सुरु होणार आहे. या अंतर्गत एकूण 260 रिक्त पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे. त्यामुळे इच्छुक असलेल्या उमेदवारांना इंडियन कोस्ट गार्ड यांच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तेथे अधिक माहिती मिळवावी अशी सुचना देण्यात आली आहे. अर्जाची प्रक्रिया 26 जानेवारी ते 2 फेब्रुवारी पर्यंत सुरु राहणार आहे.
इंडियन कोस्ट गार्ड मध्ये नाविक पदासाठी नोकरीची संधी उपलब्ध करण्यात आली आहे. त्यानुसार या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18-22 वर्ष पू्र्ण असावे. त्याचसोबत अनुसूचित जाती आणि जमाती वर्गातील उमेदवारांना पाच वर्षाची सुट देण्यात येणार आहे. तर ओबीसी जातीमधील उमेदवारांना तीन वर्षांची सूट मिळणार आहे. नाविक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने 12 वी मध्ये गणित आणि फिजिक्स विषयासह 50 टक्के गुणांनी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तर आरक्षण असलेल्या उमेदवारांना 5 टक्के म्हणजे 45 टक्क्यांनी पास असणे आवश्यक आहे.(SBI Clerk Recruitment 2020: एसबीआयमध्ये क्लर्क पदांसाठी 3387 जागांची नोकरभरती; जाणून घ्या पात्रता व कुठे कराल अर्ज)
नाविक पदासाठी उमेदवाराची निवड 12 वी मध्ये मिळालेल्या गुणांनुसार होणार आहे. तसेच लेखी परिक्षा सुद्धा उमेदवारांना द्यावी लागणार आहे. लेखी परिक्षेत पास झालेल्या उमेदवारांची पीएफटी आणि मेडिकल स्टॅडर्ड चाचणी करण्यात येणार आहे. अखेर या चाचणीत पास झालेल्यांना ट्रेनिंगसाठी शॉर्टलिस्ट करण्यात येणार आहे.