
भारतीय स्टेट बँक (SBI) ने ज्युनियर असोसिएट (ग्राहक समर्थन व विक्री) पदांसाठी भरती अधिसूचना जारी केली आहे. सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी ही चांगली संधी आहे. या पदांवर देशभरात एकूण 3387 रिक्त जागा उपलब्ध आहेत. ही भरती एसबीआय www.sbi.co.in च्या अधिकृत संकेतस्थळावरुन केली जाईल.
एसबीआय लिपिक 2020 ची नोंदणी 03 जानेवारी 2020 पासून सुरू होईल. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार एसबीआय लिपिक 2020 भरतीसाठी 26 जानेवारी 2020 रोजी किंवा त्यापूर्वी अर्ज करू शकतात. या पदांसाठी पूर्व परीक्षा फेब्रुवारी/मार्च 2020 मध्ये घेण्यात येणार आहे. मुख्य परीक्षा 19 एप्रिल 2020 रोजी घेण्यात येणार आहे.
पात्रता –
कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवी घेतलेला उमेदवार या रिक्त जागांसाठी अर्ज करू शकतो.
वयोमर्यादा -
या पदांसाठी किमान वयोमर्यादा 20 वर्षे आणि कमाल 28 वर्षे आहे. 1 जानेवारी 2020 पासून वयाची गणना केली जाईल. यामध्ये एससी, एसटी प्रवर्गातील उमेदवारांना 5 वर्षे, ओबीसी उमेदवारांसाठी 3 वर्षे आणि पीडब्ल्यूडी उमेदवारांसाठी 10 वर्षे सवलत दिली आहे.
पगार -
प्रारंभिक मूलभूत वेतन हे 13075 असून, त्यासोबत इतर भत्तेही मिळणार आहेत.
निवड प्रक्रिया -
प्राथमिक व मुख्य परीक्षा व स्थानिक भाषा परीक्षेच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. केवळ प्राथमिक परीक्षेत उत्तीर्ण झालेल्यांनाच मुख्य परीक्षेत प्रवेश मिळेल. (हेही वाचा: Central Railway Recruitment 2020: मध्य रेल्वेमध्ये मेगाभरती; 10 वी पास करू शकतात अर्ज, परीक्षा, मुलाखतीशिवाय नोकरी)
परीक्षा नमुना -
एसबीआय लिपिक प्रिलिम्स परीक्षा (SBI Clerk Prelims Exam) ऑनलाईन असेल. यात इंग्रजी, संख्यात्मक, वस्तुनिष्ठ असे 100 मार्कांचे प्रश्न असतील. उत्तरांसाठी निगेटिव्ह मार्किंगही असेल. चार चुकीच्या उत्तरांवर एक गुण वजा केला जाईल. हा पेपर 1 तासाचा असेल. यामध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मुख्य परीक्षेसाठी बोलावण्यात येईल.
अर्ज फी -
प्रथम https://bank.sbi/careers किंवा https://www.sbi.co.in/careers येथे भेट देऊन रजिस्टर करावे लागेल. जनरल, ओबीसी, ईडब्ल्यूएस प्रवर्गासाठी अर्ज फी 750 रुपये आहे. एससी/एसटी/पीडब्ल्यूडी उमेदवारांसाठी कोणतेही अर्ज शुल्क नाही. हे शुल्क डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंगद्वारे दिले जाऊ शकते.
या जॉबसाठी पूर्ण माहिती प्राप्त करून घेण्यासाठी इथे क्लिक करा