भारतीय रेल्वे (फोटो सौजन्य-फेसबुक)

मध्य रेल्वेमध्ये (Central Railway)अनेक पदांवर भरती होणार आहेत. रेल्वेने अ‍ॅप्रेंटिस (Apprentice) पोस्टसाठी अर्ज मागविले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार 22 जानेवारी 2020 रोजी किंवा त्यापूर्वी अर्ज करू शकतात. त्याअंतर्गत एकूण 2562 पदे भरली जातील. या नियुक्त्या वेगवेगळ्या विभागांमध्ये/कार्यशाळांमध्ये आणि युनिटसाठी वेगवेगळ्या ट्रेडमध्ये केल्या जातील. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करावा लागेल. महत्वाचे म्हणजे या पदांसाठी कोणतीही लेखी परीक्षा किंवा कोणतीही मुलाखत होणार नाही. निवड दहावीच्या गुणांच्या आधारे केली जाईल. अर्ज करण्यासाठी मध्य रेल्वेच्या रेल्वे भरती सेलच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.

पदाचे नाव व संख्या -

अॅोप्रेंटिस, एकूण 2562 पदे

महत्वाच्या तारखा -

मध्य रेल्वे भरती 2020 ऑनलाईन अर्ज करण्याची प्रारंभ तारीख: 23 डिसेंबर 2019

मध्य रेल्वे भरती 2020 ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख: 22 जानेवारी 2020

वयोमर्यादा -

या पदांसाठी अर्ज करण्याचे किमान वय 15 व कमाल वय 24  वर्षे आहे. यामध्ये ओबीसी प्रवर्गासाठी जास्तीत जास्त वयोमर्यादा तीन वर्षे, अनुसूचित जाती/जमातीच्या उमेदवारांसाठी पाच वर्षे आणि अपंग व्यक्तींसाठी दहा वर्षे सवलत देण्यात येईल.

शैक्षणिक पात्रता -

मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थांकडून दहावी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. यासह, संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय प्रमाणपत्र किमान 50% गुणांसह प्राप्त केले असावे.

अर्ज फी -

यासाठी 100 रुपये अर्ज फी आकारण्यात येणार आहे. एससी / एसटी / दिव्यांग आणि महिला उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. (हेही वाचा: DRDO MTS Recruitment: 'डीआरडीओ'मध्ये 1,817 पदांसाठी नोकरभरती सुरु; 10 वी पास उमेदवार करू शकतात अर्ज)

इथे करा अर्ज -

इच्छुक आणि पात्र उमेदवार मध्य रेल्वेच्या रेल्वे भरती सेलच्या अधिकृत संकेतस्थळाला http://www.rrccr.com/ भेट देऊन अर्ज करू शकतात.

महत्वाची कागदपत्रे -

दहावी प्रमाणपत्र (जन्मतारीख तपासण्यासाठी)

- जातीचे प्रमाणपत्र (लागू असल्यास)

- अपंगत्व प्रमाणपत्र (लागू असल्यास)