DRDO MTS Recruitment: 'डीआरडीओ'मध्ये 1,817 पदांसाठी नोकरभरती सुरु; 10 वी पास उमेदवार करू शकतात अर्ज
प्रतिकात्मक फोटो (File Photo)

संरक्षण मंत्रालयांतर्गत संरक्षण संशोधन व विकास संघटना (DRDO) ने मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) पदांच्या (DRDO MTS Recruitment) अर्जाची प्रक्रिया सुरू केली आहे. याअंतर्गत एकूण 1817 पदांसाठी भरती होईल. यासाठी इच्छुक उमेदवारांना डीआरडीओने ऑनलाईन अर्ज करण्यास सांगितले आहे. संगणक आधारित चाचणीद्वारे पात्र उमेदवारांची निवड केली जाईल.

इच्छुक आणि पात्र उमेदवार 23 जानेवारी 2020 पर्यंत या पदांसाठी अर्ज करू शकतील. महत्वाचे म्हणजे दहावी व आयटीआय असणारे लोकही या पदांसाठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी, उमेदवारांनी प्रथम नोंदणी करणे आवश्यक आहे. यासाठी आधी वेबसाईटवर लॉग इन करणे गरजेचे आहे. अर्जामध्ये 6 महत्वाच्या गोष्टी काळजीपूर्वक भरणे गरजेचे आहे, त्यामध्ये तुमची व्यक्तिगत माहिती, पात्रता, पोस्टिंग प्राधान्ये, कागदपत्रे आणि अर्ज फी समाविष्ट आहे.

अर्ज करण्यासाठी जनरल आणि ओबीसी उमेदवारांना 100 रुपये फी भरावी लागेल. तर, महिला आणि अनुसूचित जाती/जमाती/ पीडब्ल्यूडी/ईएसएम उमेदवारांसाठी कोणतेही अर्ज शुल्क नाही. मल्टी टास्किंग स्टाफच्या पदांच्या निवडीसाठी टायर 1 आणि टायर 2 परीक्षा घेण्यात येईल. टायर 1 मधील स्क्रिनिंग नंतर टायर 2 मध्ये अंतिम निवड होईल. ही परीक्षा हिंदी व इंग्रजी भाषेत घेण्यात येणार आहे. दोन्ही परीक्षा संगणक आधारित असतील. (हेही वाचा: 7th Pay Commission News: रेल्वेमध्ये सुरु झाली Clerk पदांसाठी नोकरभरती; 12 वी पास उमेदवार करू शकतात rrccr.com वर अर्ज)

एकूण 1817 पदांसाठी मल्टी टास्किंग स्टाफ (एमटीएस) भरती -

जनरल पोस्ट-849

ईडब्लूएस- 188

एससी-163

एसटी- 114

ओबीसी-114

महत्वाच्या तारखा - 

अर्ज करण्याची प्रारंभ तारीख - 23 डिसेंबर 2019

अर्ज करण्याची अंतिम तारीख - 23 जानेवारी 2020

पात्रता -

उमेदवार मान्यताप्राप्त बोर्ड/शाळेमधून दहावी उत्तीर्ण किंवा आयटीआय उत्तीर्ण असावा. 

अर्ज कसा करावा -

ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचे आहेत त्यांनी अधिकृत वेबसाइट drdo.gov.in वर भेट देऊन अर्ज करावा.