Post Office Recruitment 2022: पोस्टामध्ये ग्रुप सी पदांसाठी नोकरभरती; 9 मे पूर्वी करा अर्ज
India Post

Department of Posts, Ministry of Communication, Mumbai कडून ग्रुप सी च्या पदांसाठी नोकरभरती होणार आहे ही पदं नॉन गॅझेटेड आणि गैर-मंत्रिपदाची आहेत. ऑफलाईन मोडवर यासाठी अर्ज करता येणार आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 9 मे 2022 दिवशी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आहे. 9 जागांवर होणारी नोकरभरती मेकॅनिक, इलेक्ट्रिशन, टायरमॅन पदांवर होणार आहे. मेकॅनिक - 5, इलेक्ट्रिशियन – २,टायरमन - १, लोहार - १ साठी अर्ज मागवण्यात आले आहेत.

सातव्या वेतन आयोगानुसार, कुशल कारागीर पदावर होणार्‍या या भरतीमध्ये लेव्हल 2 मध्ये Rs 19,900 पे स्केल असणार आहे. तर वयोमर्यादा 1/7/22 पर्यंत 18 ते 30 वर्ष आवश्यक आहे. आरक्षणानुसार वयोमर्यादेमध्येही सूट दिली जाणार आहे. इथे पहा अधिकृत नोटिफिकेशन.

सरकारद्वारे मान्यताप्राप्त कोणत्याही तांत्रिक संस्थेचे संबंधित ट्रेडमधील प्रमाणपत्र किंवा संबंधित ट्रेडमधील एका वर्षाच्या अनुभवासह 8वी उत्तीर्ण. मेकॅनिक (मोटार वाहन) पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे अवजड वाहने चालवण्याचा वैध ड्रायव्हिंग परवाना असणे आवश्यक आहे. RailTel Recruitment 2022: रेलटेल कॉर्पोरेशनमध्ये 103  जागांवर होणार अप्रेंटिस पदांवर भरती; 4 एप्रिलपूर्वी  portal.mhrdnats.gov.in वर करा ऑनलाईन अर्ज .

पात्र आणि इच्छुक उमेदवार विहित नमुन्यात ऑफलाइन अर्ज करू शकतात आणि 9 मे 2022 रोजी किंवा त्यापूर्वी "The Senior Manager (JAG), Mail Motor Service, 134-A, Sudam Kalu Ahire Marg, Worli, Mumbai- 400018" वर अर्ज पाठवू शकतात.