Office ((Photo Credits: Pexels)

नॅशनल टेस्टिंग एजन्सी अर्थात NTA कडून NTA UGC NET Admit Card 2024 ची अ‍ॅडमीट कार्ड्स जारी करण्यात आली आहेत. अधिकृत वेबसाईट ugcnet.nta.ac.in वरून उमेदवारांनाअ ती डाऊनलोड करता येणार आहे. ही परीक्षा 21,22,23 ऑगस्ट दिवशी होणार आहे. दरम्यान विद्यार्थ्यांना अ‍ॅडमीट कार्ड डाऊनलोड करण्यामध्ये कोणताही अडथळा असल्यास ते 011- 40759000 या नंबर वर संपर्क साधू शकतात. ugcnet@nta.ac.in वर देखील आपल्या समस्या सांगू शकतात. NCERT e-Jaadui Pitara Mobile App: आता मुले खेळत खेळत करणार अभ्यास; NCERT ने आणली नवीन कल्पना, लॉन्च केला 'ई-जादूई पिटारा मोबाइल ॲप'. 

ची अ‍ॅडमीट कार्ड्स कशी कराल डाऊनलोड?

  • अधिकृत वेबसाईट ugcnet.nta.ac.in वर क्लिक करा.
  • होम पेज वर अ‍ॅडमीट कार्डची लिंक पाहता येणार आहे.
  • आता लॉग ईन डिटेल्स टाका.
  • अ‍ॅडमीट कार्ड डाऊनलोड करा.
  • तुमच्या अ‍ॅडमीट कार्डची प्रिंट आऊट देखील काढता येऊ शकते.

National Testing Agency कडून 26 ऑगस्टच्या परीक्षा वगळता अन्य परीक्षांसाठी exam city slip दिली आहे. 26 ऑगस्टला जन्माष्टमी असल्याने 27 ऑगस्टला ही परीक्षा होणार आहे.

UGC NET examination यंदा 21 ऑगस्ट पासून होणार आहे. 4 सप्टेंबर पर्यंत त्यांचे नियोजन करण्यात आले आहे. ही परीक्षा CBT मोड मध्ये होणार असून 83 विषयांसाठी ती होईल. दोन शिफ्ट मध्ये परीक्षा होणार आहेत. सकाळी पहिले सत्र 9 ते 12 आणि दुपारी दुसरं सत्र 3 ते 6 असणार आहे.

UGC-NET परीक्षेद्वारा Junior Research Fellowship,तसेच Assistant Professor पदासाठी नियुक्ती होते. पीएचडी साठी अ‍ॅडमिशन देखील याच परीक्षेने होते.