Mumbai University | (Photo Credits: mu.ac.in)

महाराष्ट्र बोर्डाकडून 12वी निकालांची घोषणा केल्यानंतर आता मुंबई विद्यापीठामध्ये (Mumbai University) शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी अंडरग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट अभ्यासक्रमांसाठी आता प्रवेशप्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. आज 8 मे 2025 पासून हे प्रवेश सुरू झाले आहेत. मुंबई विद्यापीठ राष्ट्रीय शिक्षण धोरण (एनईपी) 2020 आणि 20 एप्रिल 2023  च्या सरकारी निर्णय (जीआर) नुसार प्रवेश घेत आहे. या प्रक्रियेत विविध पदवीपूर्व अभ्यासक्रमांचा समावेश असेल, ज्यामध्ये तीन वर्षांचे पदवीपूर्व अभ्यासक्रम, चार वर्षांचे Honours Programmes आणि पाच वर्षांचे Integrated UG-PG Courses यांचा समावेश असेल. याव्यतिरिक्त, पदव्युत्तर कार्यक्रम देखील याच अ‍ॅडमिशन शेड्युल मध्ये असणार आहेत. जेणेकरून सर्व शैक्षणिक उपक्रम नव्या शैक्षणिक सुधारणांनुसार होणार आहेत. नक्की वाचा: New Courses and Career Options After HSC: बारावीनंतर कला आणि नवीन तंत्रज्ञानाचा मेळ असलेले हटके कोर्सेस पर्याय; उघडतील नव्या करिअरची दारे.  

यूजी पीजी कोर्सेस साठी प्रवेशाच्या नव्या तारखा

आजपासून सुरू झालेल्या या प्रवेश प्रक्रियेमध्ये पहिली यादी 27 मे दिवशी जाहीर केली जाईल तर नियमित वर्ग 13 जून पासून सुरू होणार आहेत.  दरम्यान विद्यार्थ्यांनी प्रवेशपूर्व नोंदणी केल्याशिवाय महाविद्यालयांमध्ये  प्रवेश अर्ज स्वीकारले जाणार नाहीत अशी माहिती मुंबई विद्यापीठाकडून दिली आहे. मुंबई विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाईट वर विद्यार्थ्यांना सारी माहिती मिळणार आहे.