MPSC | (File Photo)

एमपीसीएसीकडून (MPSC) दरवर्षी नोकरभरती केली जाते. मात्र अलीकडच्या काही वर्षात यातील पदांची संख्या कमी झाल्याचे दिसते. एमपीएससीकडून भरती केल्या जाणाऱ्या पदांवर तरुणांचे विशेष लक्ष असते. कारण ही पदे प्रशासनातील महत्त्वाची पदे असतात आणि त्यात करियरची (Career) उत्तम संधी असते. एमपीएससीकडून सर्वसाधारणपणे पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा घेत नोकरभरती केली जाते.महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे राज्य सरकारच्या विविध विभागांमधील एकूण 800 पदांची भरती प्रक्रिया लवकरच पार पडणार आहे. त्यासाठी MPSC कडून 8 ऑक्टोबर 2022 ला परीक्षा घेण्यात येणार आहे.

अर्ज भरण्याची प्रक्रीया :-

परिक्षेसाठी इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरावा लागणार आहे. अर्ज भरण्याची शेवटची तारीख 15 जुलै 2022 आहे. या कालावधीत ऑनलाइन अर्ज (Online Application) करायचा आहे. खुल्या वर्गातील उमेदवारांना 394 रुपये अर्ज शुल्क तर आरक्षित वर्गातील उमेदवारांना 294 रुपये शुल्क भरावे लागणार आहे. एमपीएससीच्या वेबसाईटवर जाऊन अधिक माहिती पाहता येईल. ( हेही वाचा :- DEBEL, DRDO Recruitment 2022: DRDO, DEBEL मध्ये मोठ्या पदांची नोकरी भरती, मिळवा बड्या पगाराची नोकरी)

 

 कुठल्या पदांसाठी किती जागा रिक्त :-

  1. सामान्य प्रशासन विभाग- सहाय्यक कक्ष अधिकारी गट-ब (अराजपत्रित)- 42 पदं
  2. वित्त विभाग- राज्य कर निरीक्षक गट-ब (अराजपत्रित)- 77 पदं
  3.  गृह विभाग- पोलिस उपनिरीक्षक गट-ब (अराजपत्रित)- 603 पदं
  4.   महसूल आणि वन विभाग- दुय्यम निबंधक (श्रेणी १)/ मुद्रांक निरीक्षक गट-ब अराजपत्रित- 78 पदंसर्व पदांपैकी महिलांसाठी 30% तर 5% पदं खेळाडूंसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत.

 

अर्ज करण्यासाठी आवश्यक दस्तवेज :-

पदभरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी दहावी, बारावी आणि शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला , ओळखपत्र  आणि पासपोर्ट साईझ फोटो हे दस्तावेज सोबत जोडणे आवश्यक आहे. महिलांसाठी आरक्षित पदांकरिता दावा करणाऱ्या उमेदवारांनी महिला आरक्षणाचा लाभ घ्यायचा असल्यास त्यांनी अर्जामध्ये न चुकता महाराष्ट्राचे अधिवासी असल्याबाबत आणि नॉन-क्रिमी लेअरमध्ये मोडत असल्याबाबत  स्पष्टपणे दावा करणं आवश्यक आहे.

परीक्षेसाठी नोंदणी करायची असल्यास उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीनं अर्ज भरणे गरजेचा आहे. परीक्षेसंबंधी सविस्तर माहिती https://mpsconline.gov.in आणि https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. सरकारी नोकरी शोधणाऱ्या आणि MPSC ची तयारी करत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही उत्तम संधी आहे.