MPSC Prelims Answer Key 2021 जाहीर, mpsc.gov.in वर विद्यार्थ्यांना पाहता येणार
MPSC Exam | Image used for Representational Purpose | (Photo Credits: Pixabay.Com)

MPSC Prelims Answer Key 2021: महाराष्ट्र लोक सेवा आयोगाकडून उत्तरप्रत्रिकेची की जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना ही उत्तरपत्रिकेची की mpsc.gov.in वर जाऊन तपासून पाहता येणार आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोगाचे आयोजन 21 मार्चला करण्यात आली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता ही उत्तरपत्रिकेची की डाऊनलोड सुद्धा करता येणार आहे. तर विद्यार्थ्यांना जर उत्तरपत्रिकेच्या की वर काही आक्षेप असल्यास त्यासंदर्भात 31 मार्च 2021 पर्यंत कळवावे.(महाराष्ट्रातील 1,800 तरुणांना मिळणार Digital Marketing आणि Artificial Intelligence चे प्रशिक्षण; केले जाणार नोकरीसाठी प्रयत्न, जाणून घ्या कुठे कराल नोंदणी) 

परीक्षा 21 मार्च 2021 रोजी दोन शिफ्टमध्ये दोन तासांची घेण्यात आली होती. त्यामधील पहिला पेपर जनरल स्टडिज आणि दुसरा पेपर CSAT चा होता. तर ज्या विद्यार्थ्यांनी प्राथमिक परीक्षा उत्तीर्ण केली असेल त्यांना एमपीएससीच्या मुख्य परीक्षेला बसता येणार आहे.(Mumbai University Final Year Exams 2021: मुंबई विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा 6-21 मे दरम्यान ऑनलाईन होणार)

>>MPSC State Answer Key 2021 अशा पद्धतीचे तपासून पहा

-प्रथम MPSC ची अधिकृत वेबसाइट www.mpsc.gov.in ला भेट द्या.

-येथे आता State Service Preliminary Examination 2020-1-Answer key आणि State Service Preliminary Examination 2020-Paper 2- Answer key हे लेटेस्ट अपडेट्सच्या येथे दिसेल.

-आता MPSC Answer Key तुम्हाला पीडीएफ मध्ये दिसून येणार आहे.

-आता उत्तर तपासून पहा आणि तर काही आक्षेप असल्यास त्या संदर्भात सुद्धा सांगता येणार आहे.

एमपीएससीकडून 806 पदांसाठी फेब्रुवारी महिन्यात एक नोटीस जाहीर करण्यात आली होती. तर 806 पैकी 475 पोलीस सब इन्सपेक्टर, 52 असिस्टंट सिलेक्शन ऑफिसर आणि 64 टॅक्स इन्सपेक्टर पदांवर भरती केली जाणार आहे.