Examinations | (Representational Purpose | Photo Credits: Pixabay.com)

MSBSHSE HSC Board Exam 2025:  महाराष्ट्र बोर्डाची बारावीची परीक्षा (Maharashtra Board HSC Exam) राज्यात 11 फेब्रुवारी पासून सुरू होणार आहे. यंदा या परीक्षेला 15 लाखाहून अधिक विद्यार्थी सामोरे जाणार आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या अध्यक्षांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात 8,10,348 मुले, 6,94652 मुली, तर 37 ट्रान्सजेंडर विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. बारावीच्या बोर्ड परीक्षा यंदा 3,373 मुख्य केंद्रांवर आयोजित करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र बोर्डाची बारावीची परीक्षा यंदा 10 दिवस आधी सुरू होत आहे.

एचएससी बोर्डाच्या परीक्षा पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळामध्ये होणार आहे. या परीक्षा लवकर सुरू होत असल्याने 15 मे पर्यंत बोर्ड परीक्षांचे निकाल लावले जातील असा अंदाज आहे.

परीक्षा काळामध्ये गैरप्रकार टाळण्यासाठी यंदा अधिक चोख यंत्रणा सुसज्ज ठेवली जाणार आहे. संपूर्ण राज्यात 271 भरारी पथकं सज्ज ठेवण्यात आली आहेत. नक्की वाचा: Maharashtra Board Exams 2025: महाराष्ट्र बोर्ड परीक्षा मध्ये यंदा ज्या केंद्रावर गैरप्रकार आढळतील त्यांच्या केंद्राची मान्यता कायमस्वरूपी रद्द. 

MSBSHSE बोर्ड परीक्षेबाबत महत्त्वाची माहिती

MSBSHSE बोर्ड परीक्षा सकाळी 11 ते 2 आणि दुपारी 3 ते 6 या वेळेत होणार आहे. या परीक्षेला जाताना विद्यार्थांकडे त्यांचे हॉल तिकीट असणं आवश्यक आहे. 11 फेब्रुवारी पासून सुरू होणारी ही परीक्षा 11 मार्च 2025 पर्यंत चालणार आहे. इंग्रजी विषयाच्या पेपर ने या परीक्षेची सुरूवात होणार आहे. बारावी बोर्ड परीक्षा 2025 पीडीएफ स्वरूपातील वेळापत्रक इथे करा डाऊनलोड.

 

View this post on Instagram

 

A post shared by MAHARASHTRA DGIPR (@mahadgipr)

परीक्षेच्या आधी 30 मिनिटं विद्यार्थी परीक्षा केंद्रावर पोहचणं आवश्यक आहे.  अकरा वाजल्यानंतर कोणालाही परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही. त्यांना परीक्षेसाठीचं साहित्य, हॉल तिकीट  घेऊन जाता येणार आहे. पेपर लिहण्यासाठी काळा किंवा निळा पेन वापरता येणार आहे. या व्यतिरिक्त स्मार्ट वॉच, मोबाईल किंवा अन्य उपकरणं घेऊन जाण्यास बंदी असणार आहे.  सुरक्षेच्या कारणास्तव विद्यार्थ्यांना वर्गात पाणी आणू देणे बंद करण्यात आले आहे.