Maharashtra Board Exams 2025: महाराष्ट्र बोर्ड परीक्षा मध्ये यंदा ज्या केंद्रावर गैरप्रकार आढळतील त्यांच्या केंद्राची मान्यता कायमस्वरूपी रद्द
राज्यात एचएससी म्हणजे 12वीची परीक्षा 11 फेब्रुवारी तर एसएससी म्हणजे 10वीची परीक्षा 21 फेब्रुवारी पासून सुरू होणार आहे.
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या बोर्ड परीक्षा आता काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. मार्च 2025 मध्ये 10वी, 12वीच्या परीक्षांना सुरूवात होणार आहे. या बोर्ड परीक्षा विद्यार्थ्यांच्या करियरचा टर्निंग पॉईंट असतात म्हणूनच या परीक्षा पारदर्शक पद्धतीने आणि गैरप्रकार टाळून पार पाडण्याचं आव्हान शिक्षण मंडळासमोर आहे. यंदा गैर प्रकार टाळण्यासाठी विशेष काळजी घेतली जाणार आहे पण ज्या परीक्षा केंद्रावर गैरमार्गाचे प्रकार आढळतील तेथे परीक्षा केंद्र मान्यता रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बोर्डाकडून याची स्पष्ट माहिती देण्यात आली आहे.
यंदा 12वी, 10 वी च्या बोर्ड परीक्षेत जर कोणत्या परीक्षा केंद्रावर गैरप्रकार होत असल्याचं दिसून आलं तर त्याची मान्यता आता कायमची रद्द करण्याचा निर्णय बोर्डाने घेतला आहे. सोबतच कोरोनाचा काळ वगळता मागील 5 वर्षात ज्या परीक्षा केंद्रांवर गैर प्रकार झाल्याचं दिसून आलं होतं तेथे आता अन्य शाळेतून केंद्र संचालक, पर्यवेक्षक नेमण्यात येणार असल्याची माहिती देखील देण्यात आली आहे. नक्की वाचा: Burqa Ban In Maharashtra Board Exams? : बुरखा घालून 10वी, 12वी बोर्ड परीक्षेच्या विद्यार्थींना परवानगी नको; नितेश राणे यांचं शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांना पत्र .
यंदाही बोर्डाच्या परीक्षा केंद्रांवर एक बैठे पथक आणि भरारी पथक यांचं लक्ष राहणार आहे. राज्यात एचएससी म्हणजे 12वीची परीक्षा 11 फेब्रुवारी तर एसएससी म्हणजे 10वीची परीक्षा 21 फेब्रुवारी पासून सुरू होणार आहे.
(The above story first appeared on LatestLY on Jan 30, 2025 07:01 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

