12th Result | File Image

महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाकडून आज (5 मे) बारावीचा निकाल (Maharashtra Board 12th Results) जाहीर करण्यात आला आहे. आता दुपारी 1 वाजल्यापासून विद्यार्थ्यांना त्यांचे बारावी बोर्ड परीक्षेचे गुण  results.digilocker.gov.in,  mahahsscboard.in, hscresult.mkcl.org या बोर्डाच्या अधिकृत वेबसाईट्स सोबतच अन्य थर्ड पार्टी वेबसाईट्स वरही पाहता येणार आहेत. हा निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना आईचं नाव आणि रोल नंबर टाकावा लागेल. त्यानंतर काही क्षणात तुमचा निकाल स्क्रिनवर दिसणार आहे. आज सकाळी बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, राज्याचा बारावी परीक्षेचा बोर्डाचा निकाल 91.88% लागला आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत हा निकाल 1.49% कमी आहे. यंदाची मुलींनी बारावीच्या निकालामध्ये बाजी मारली आहे. सुमारे 5% अधिक मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. आज ऑनलाईन निकालानंतर उद्या पासून शाळा, कॉलेजात गुणपत्रिकांचे वाटप सुरू होणार आहे.  MSBSHSE 12th Results 2025: महाराष्ट्र बोर्ड बारावीचा निकाल SMS, digilocker.gov.in, DigiLocker App च्या माध्यमातून कसा पहाल? 

कसा पहाल बारावीचा निकाल ऑनलाईन?

  • बोर्डाच्या अधिकृत बेवसाइटवर जा.
  • होमपेजवर ‘महाराष्ट्र एचएससी निकाल २०२५’ लिंक दिसेल. त्या लिंकवर क्लिक करा.
  • क्लिक करताच नवीन विंडो उघडेल. त्याठिकाणी सीट नंबर टाका नंतर आईचे नाव टाका.
  • सबमिट’ बटणावर क्लिक करा.
  • यानंतर तुमचा रिझर्ट स्क्रीनवर दिसेल.
  • हा रिझर्ट डाऊनलोड करून ठेवा.

इथे पहा तुमचा बारावीचा निकाल  

Maharashtra HSC Result 2025 मोबाईल वर SMS द्वारा कसा पहाल?

    • SMS द्वारा निकाल पाहण्यासाठी MHHSC{SPACE} Seat Number तुम्हांला 57766 वर पाठवावा लागेल.
    • आता तुम्ही ज्या नंबर वरून मेसेज पाठवला आहे त्या नंबर वर निकाल एसएमएस च्या माध्यमातून कळवला जाईल.

पुणे, नागपूर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, कोकण, छत्रपती संभाजी नगर, लातूर या 9 विभागातून एकूण 14 लाख 27 हजार 85 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यातून 14 लाख 17 हजार 969 विद्यार्थी प्रविष्ट झाले. आज जाहीर झालेल्या निकालानुसार, 13 लाख 2 हजार 873 विद्यार्थी पास झाले आहेत. आजच्या निकालामध्ये कोकण विभाग अव्वल ठरले आहे तर सर्वात कमी निकाल लातूर विभागाचा लागला आहे.  Maharashtra Board 12th Result 2025: बारावीचा निकाल 1 वाजता जाहीर होणार; पण निकालावर समाधानी नसाल तर गुणपडताळणी, श्रेणी, गुणसुधार, पुरवणी परीक्षेसाठी कसा कराल अर्ज?

दरम्यान 12वीच्या बोर्ड परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक विषयामध्ये विद्यार्थाला किमान 35% गुण आवश्यक आहेत. राज्यात परीक्षेच्या कालावधीत 124 केंद्रांवर 364 -366 कॉपी केसेस समोर आल्या,  तर या सर्व केंद्रांची मान्यता कायमस्वरूपी रद्द करणार असल्याचे बोर्डाचे अध्यक्ष गोसावी यांनी स्पष्ट केलं.