Girl Student | (File Image

Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education कडून आज (5 मे) बारावीचा निकाल जाहीर केला जाणार आहे. सकाळी 11 वाजता निकालाची आकडेवारी आणि त्यानंतर दुपारी 1 वाजता विद्यार्थ्यांना त्यांची संपूर्ण गुणपत्रिका पाहता येणार आहे. हा निकाल विद्यार्थ्यांना बोर्डाची अधिकृत वेबसाईट mahahsscboard.in वर पाहता येणार आहे. दरम्यान बोर्डाच्या वेबसाईट सोबतच अन्य थर्ड पार्टी वेबसाईट्स वरही निकाल पाहता येणार आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाईन अधिकृत वेबसाईट्स सोबतच SMS च्या माध्यमातूनही निकाल पाहता येणार आहे. पण तुम्ही या निकालावर समाधानी नसाल तर लगेजच मनाने खचू नका. तुम्हांला बोर्डाकडून गुणपडताळणी, गुणसुधार, श्रेणी सुधार आणि पुरवणी परीक्षेचा देखील पर्याय दिला आहे. याच्या माध्यमातून तुमचे शैक्षणिक वर्षाचे नुकसान टाळता येऊ शकते. मग या पर्यायांसाठी काय सोय आहे? हे नक्की जाणून घ्या.

बारावी निकालाचे व्हेरिफिकेशन

आज निकालानंतर 6 मे ते 20 मे 2025 पर्यंत विद्यार्थी बोर्डाच्या अधिकृत वेबसाईट्स वर उत्तरपत्रिकांची फोटोकॉपी साठी अर्ज करता येनार आहे. तसेच ग्रेडेड विषय वगळता अन्य विषयांसाठी मार्क्स व्हेरिफिकेशन अर्थात गुणपडताळणीसाठी अर्ज करता येऊ शकतो. ज्युनियर कॉलेजमध्येही त्यासाठी अर्ज करता येऊ शकतो. ऑनलाइन शुल्क भरण्यासाठी डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, यूपीआय आणि नेट बँकिंग या सर्वांचा वापर करता येतो.verification.mh-hsc.ac.in वर अर्ज करता येणार आहे.

उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करण्यापूर्वी उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे आवश्यक आहे. छायाप्रत मिळाल्यानंतर, विद्यार्थ्यांना मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून आणि विभागीय मंडळाकडे आवश्यक पैसे सादर करून पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी पाच कामकाजाचे दिवस आहेत. ज्या विद्यार्थ्यांना त्यांच्या उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन करायचे आहे त्यांनी त्यांच्या विभागीय मंडळाशी संपर्क साधावा.

श्रेणी सुधार साठी काय कराल?

श्रेणी सुधारणा योजनेअंतर्गत, नुकत्याच झालेल्या परीक्षेत प्रत्येक विषयात उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांचे गुण सुधारण्याच्या तीन संधी असतील जून-जुलै २०२५, फेब्रुवारी-मार्च २०२६ आणि जून-जुलै २०२६ मध्ये विद्यार्थी अर्ज करू शकतात.

पुरवणी परीक्षेसाठी काय कराल?

जून किंवा जुलै २०२५ मध्ये होणाऱ्या पुरवणी परीक्षेसाठी रिपीटर्स, गुण वाढवू इच्छिणारे आणि खाजगी अर्जदार 7 मे रोजी बोर्डाच्या वेबसाइटवर ऑनलाइन नोंदणी फॉर्म भरण्यास सुरुवात करू शकतात. MSBSHSE 12th Results 2025: महाराष्ट्र बोर्ड बारावीचा निकाल SMS, digilocker.gov.in, DigiLocker App च्या माध्यमातून कसा पहाल? 

. या परीक्षेसाठी एकूण 15,05,037 विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली होती. त्यामध्ये 8,10,348 मुले, 6,94,652 मुली व 37 ट्रान्सजेंडर आहेत. एकूण 10550 कनिष्ठ महाविद्यालयांमधून या विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली होती. या परीक्षेसाठी संपूर्ण राज्यात विद्याथ्यांसाठी 3373 मुख्य केंद्रांवर परीक्षा आयोजित करण्यात आली होती.