Indian Navy Bharti 2021: भारतीय नौसेनेत शॉर्ट सर्विस कमीशन ऑफिसर पदासाठी नोकर भरती केली जाणार आहे. यासाठी एक नोटिफिकेशन सुद्धा जाहीर केले आहे. नौसेनेत एससएसी जनरल सर्विस आणि हायड्रो कॅडरच्या पदावर नोकर भरती केली जाणार आहे. त्यामुळे या नोकर भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी नौसेनेची अधिकृत वेबसाइट joiningindiannavy.gov.in च्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज करु शकता.(UPSC IES ISS 2020 Interview Schedule: युपीएससी कडून आयईएस,आयएसएस च्या मुलाखत फेरीचे वेळापत्रक upsc.gov.in वर जारी)
इंडियन नेव्हीमध्ये एसएससी ऑफिसरच्या पदावर एकूण 50 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रियेची अंतिम तारीख 26 जून 2021 ठेवण्यात आली आहे. अर्ज करण्यापूर्वी नोटिफिकेशन नीट वाचून घ्यावे. अन्यथा अर्ज करताना चूक झाल्यात तो स्विकारला जाणार नाही आहे. त्याचसोबत अंतिम तारखेपूर्वीच अर्ज करावा असे स्पष्ट केले आहे. नेव्हल ओरिएंटेशन कोर्स, भारतीय नौसेना अॅकाडमी एझिमाला, केरळात जानेवारी 2022 पासून सुरु होणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना दोन वेगवेगळ्या अभ्यासक्रम-जनरल सर्विस आणि हायड्रोग्राफीची ट्रेनिंग घ्यावी लागणार आहे.
नोकर भरती संदर्भात अधिक माहिती-
>>एसएससी जनरल सर्विस- 47 पद
>>हायड्रो कॅडर- 3 पद
>>इंडियन नेव्हीमध्ये एकूण रिक्त पदांची संख्या- 50 पद
उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त युनिव्हर्सिटीमधून कमीतकमी 60 टक्के गुणांसह कोणत्याही विषयात बीई किंवा बीटेक पास केले असावे. ज्या उमेदवारांनी एकूण किंवा समकक्ष सीपीजीए मध्ये कमीतकमी 60 टक्के गुणांसह ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन केले आहे ते यासाठी अर्ज करु शकता. शैक्षणिक योग्यतेच्या पूर्ण माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
योग्य उमेदवाराची निवड डिग्री कोर्सच्या पाचव्या सेमिस्टरमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारवर केली जाणार आहे. एसएसबी द्वारे बैंगलोर, विशाखापट्टणम, भोपाळ आणि कोलकाता येथे 21 जुलै रोजी अस्थायी रुपात इंटरव्यू आयोजित केले जाणार आहेत. मेरिट लिस्ट एसएसबीच्या आधारावर तयार केली जाणार आहे.एसएसबी द्वारे स्वाथ रुपात फिट असणाऱ्या उमेदवारांना एन्ट्री प्रमाणे मेरिट लिस्ट आणि रिक्त संख्येच्या आधारावर ट्रेनिंगसाठी नियुक्त केले जाणार आहे.