UPSC IES ISS 2020 Interview Schedule: युपीएससी कडून आयईएस,आयएसएस च्या मुलाखत फेरीचे वेळापत्रक upsc.gov.in वर जारी
UPSC | Representational Image (Photo Credits: PTI)

द युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन कडून यंदाच्या UPSC IES ISS 2020 मुलाखतीचं वेळापत्रक जारी करण्यात आलं आहे. upsc.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर त्याची माहिती देण्यात आली आहे. यंदा UPSC IES ISS interview 19 ते 22 जुलै 2021 दरम्यान घेतले जाणार आहेत. हे दोन सत्रामध्ये होतील. पूर्वी UPSC IES ISS च्या मुलाखती या 12 एप्रिल ये 23 एप्रिल दरम्यान आयोजित करण्यात आल्या होत्या. मात्र देशात दुसर्‍या कोरोना वायरस लाटेचा वेग पाहता त्यांना लांबणीवर टाकण्याचा निर्णय झाला होता.

UPSC IES ISS interview schedule पीडीएफ मध्ये तारीख, शॉर्ट लिस्ट केलेल्यांचे रोल नंबर आहेत. या मुलाखतीच्या फेर्‍या झाल्यानंतर आता अंतिम निकाल जाहीर केला जाणार आहे. दरम्यान उमेदवारांना सारी व्हॅलिट डॉक्युमेंट्स मुलाखतीच्या फेरीसाठी घेऊन जाणं आवश्यक आहे.

UPSC IES ISS Interview Date 2020

 

19 जुलै ते 22 जुलै दरम्यान सकाळी 9 आणि दुपारी 1 वाजता अशा दोन सत्रामध्ये मुलाखतीच्या फेर्‍या होणार आहेत.

UPSC IES ISS Interview Time Table 2020 डाऊनलोड कशी कराल?

  • upsc.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
  • होमपेजवर ‘Interviews’ टॅब वर क्लिक करा.
  • interview schedules वर क्लिक करा.
  • नवीन पेज ओपन होईल. UPSC IES ISS link वर क्लिक करा.
  • नंतर UPSC IES ISS interview timetable PDF स्क्रिन वर ओपन होईल.
  • Ctrl+F करून तुमचा रोल नंबर पाहता येईल.

UPSC IES ISS exam देणार्‍यांना प्रिलिम्स, मेन्स आणि मुलाखत अशा तीन फेर्‍यांमधून जावे लागणार आहे. प्रत्येक स्तरावर क्वालिफाय होण्यासाठी UPSC IES ISS cut-off च्या बरोबरीचे किंवा त्याहून अधिक मार्क्स असणं आवश्यक असते. UPSC IES ISS interview 2020 साठी यंदा 162 उमेदवार क्वालिफाईड झाले आहेत. या 162 पैकी 131 जणांना UPSC Indian Statistical Services आणि 31 जणांना UPSC Indian Economic Services बोलावण्यात आले आहे.