गोवा मुख्यंमंत्री प्रमोद सावंत (Photo Credits-ANI)

देशभरात कोरोना व्हायरसने (Coronavirus) थैमान घातल्याने सरकारकडून त्याच्या विरोधात लढण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. परंतु अद्याप 2020-21 या वर्षाचे शैक्षणिक वर्ष सुद्धा सुरु करण्यात आलेले नाही. कोरोनाच्या परिस्थितीमुळे शाळा, महाविद्यालये सुद्धा बंद ठेवण्यात आली आहेत. त्याचसोबत काही परीक्षा सुद्धा रद्द करण्यासह पुढे ढकलल्या आहेत. याच दरम्यान गोव्यात (Goa) राज्यातील शिक्षण विभागाकडून 15 ऑगस्ट पर्यंत 2020-21 साठी शैक्षणिक वर्ष सुरु करण्याची अपेक्षा केली जात होती. मात्र यावर आता गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी अधिक स्पष्टीकरण दिले आहे.

प्रमोद सावंत यांनी असे म्हटले आहे की, कोरोना व्हायरचे संकट पाहता अद्याप नवीन शैक्षणिक सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आलेला नाही. मात्र शैक्षणिक वर्ष सुरु होण्यासाठी काही वेळ लागेल असे ही त्यांनी म्हटले आहे. शैक्षणिक वर्ष सुरु करण्याचा निर्णय हा गृहमंत्रालयाकडून जाहीर केल्या जाणाऱ्या मार्गदर्शक सुचनांच्या आधारावर असणार आहे. सध्या कोरोनाच्या संकटाचा सामना करत असून शाळा आणि महाविद्यालये नेमके कधी सुरु करु याबद्दल खात्री देऊ शकत नाही.(SSC-HSC Re Exam 2020 Update: दहावी-बारावीच्या फेरपरीक्षा ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता- वर्षा गायकवाड)

परंतु ज्यावेळी शैक्षणिक वर्ष सुरु होईल तेव्हा राज्य सरकारकडून 10 वी आणि 12 वी चे वर्ग पहिल्या टप्प्यात सुरु करु असे ही प्रमोद सावंत यांनी म्हटले आहे. त्याचसोबत सरकारने काही कंपन्यांची नेमणूक करणार असून ज्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी मदत करणार आहेत. राज्यातील सहा महाविद्यालये अशी केंद्रे असतील जी पुढील वर्षात अशा स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन करतील असे ही पुढे प्रमोद सावंत यांनी म्हटले आहे. सावंत म्हणाले की, व्यावसायिक महाविद्यालयांची फी भरण्यासाठी विद्यार्थ्यांना व्याजमुक्त निधी उपलब्ध करुन देण्यासाठी राज्य सरकार राष्ट्रीयकृत बँकांशी करार करणार आहे.