Flipkart कडून आगामी फेस्टिव्ह सीझनच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांसाठी 45 दिवसांची Paid Internship Programme जाहीर; दिवसाला किमान 500 रूपये कमावण्याची संधी
Flipkart | File Photo

Internship In Flipkart 2020: ई कॉमर्स वेबसाईट Flipkart येत्या काही दिवसांमध्ये यंदाच्या वर्षीचा बिग बिलियन डे सेल घेऊन येत आहे. त्यासाठी तयारी सुरू असतानाच आज (10 ऑक्टोबर) फ्लिपकार्ट कडून Paid Internship Programme Launchpad जाहीर करण्यात आली आहे. या इंटर्नशीप प्रोग्राम मध्ये देशभरात tier-II शहरातील अंडर ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांना फ्लिपकार्टसोबत काम करायला मिळणार आहे. सोबतच सप्लाय चेन मॅनेजमेंट स्किल (Supply Chain Management) आणि ई कॉमर्स क्षेत्रातील इकोसिस्टीम बाबत प्रत्यक्ष शिकायला मिळणार आहे. हा 45 दिवसांचा इंटर्नशीप प्रोगाम असून त्यासाठी विद्यार्थ्यांना किमान प्रतिदिन 500 रूपये मानधन मिळणार आहे. म्हणजे हा पूर्ण प्रोग्राम केल्यास अंदाजे 22,500 रूपये कमावण्याची संधी विद्यार्थ्यांकडे सध्या आहे.

पुढील आठवड्यापासून भारतामध्ये सणासुदीचा हंगाम सुरू होत आहे. नवरात्र, दिवाळी पाठोपाठ लग्नाचा मोसम आणि न्यू इयरची धूम आहे. त्यामुळे या काळात फ्लिपकार्ट 16 ऑक्टोबर पासून बिग बिलियन डे सेल सुरू करत आहे. या काळात अनेक शॉपर्स त्यांचे प्रोडक्ट्स ऑनलाईन बाजारपेठेत उपलब्ध करतात. तर सध्या कोरोना व्हायरस लॉकडाऊन असल्याने अनेकजण सुरक्षित खरेदीसाठी ऑनलाईन खरेदी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे याकाळात मोठी उलाढाल होईलअसा विश्वास ई कॉमर्स कंपन्यांना आहे. Flipkart Big Billion Days Sale 2020: बिग बिलियन डे सेल पूर्वीच ग्राहकांना अवघ्या एक रूपयामध्ये वस्तू Pre-Book करता येणार; इथे जाणून घ्या या धमाकेदार ऑफर्स बद्दल!

मागील वर्षी देखील 'बिग बिलियन डे सेल' च्या आसपास लॉन्च करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांसाठीच्या इंटर्नशीप प्रोग्राम मध्ये 2000 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यंदा देखील फ्लिपकार्ट देशभरातील 21 शैक्षणिक संस्थांसोबत काम करत आहे. त्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना या इंटर्नशीपमध्ये जोडण्याचा प्रयत्न आहे. यात महाराष्ट्रातील भिंवडी परिसराचा समावेश करण्यात आला आहे.

इंटर्नशीप प्रोग्राममध्ये विद्यार्थी आला नंतर त्याला सप्लाय चेन मॅनेजमेंटचे विविध पैलू जवळून पाहता येणार आहेत. शिकता येणार आहेत. कोविड 19 ची स्थिती पाहता प्रत्येकाच्या आरोग्याची काळजी घेतली जाईल. सोशल डिस्टन्सिंग पाळत प्रत्येकाचं नियमित थर्मल चेकिंग केलं जाईल. त्यासोबतच Aarogya Setu app कामाच्या ठिकाणी वापरलं जाणार आहे.