CBSE Class 12th, 10th Results यंदा 11 व 13 जुलै दिवशी जाहीर होणार असल्याचे व्हायरल पत्रक खोटं; बोर्डाकडून निकालाच्या तारखा जाहीर नाही
CBSE Board Exam Dates 2020| File Photo

CBSE Board Results 2020 Dates: कोरोना संकटकाळात भारतातील सीबीएससी बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय झाल्यानंतर आता बोर्डाकडून निकालाची तारीख (CBSE Exam Results Dates)  जाहीर करण्यात आल्याचं एक पत्रक व्हायरल होत आहे, मात्र ते खोटं आहे. दरम्यान देशात सीबीएसई बोर्डाच्या 12वीचा निकाल 11 जुलै दिवशी तर 10वीचा निकाल 13 जुलै दिवशी संध्याकाळी 4 वाजता जाहीर केला जाणार आहे असा दावा त्यामध्ये करण्यात आला आहे. मात्र काही वेळापूर्वीच बोर्डाने अद्याप बोर्डाच्या परीक्षांच्या निकालाच्या तारखा जाहीर केलेल्या नसल्याचं सांगितलं आहे. हे देखील वाचा: CBSE Syllabus Reduction: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ इयत्ता 9 ते 12 पर्यंतच्या अभ्यासक्रमात 30% कपात.

दरम्यान देशामध्ये कोरोना संकट पाहता परीक्षा रद्द करून सरासरी आणि अंतर्गत मूल्यमापन गुणपद्धतीच्या आधारे निकाल जाहीर केला जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयात परीक्षा रद्द करून निकाल जुलै महिन्याच्या मध्यापर्यंत लावण्याची बोर्डाची तयारी असल्याची माहिती देण्यात आली होती.

सीबीएसई बोर्डाची माहिती 

दरम्यान विद्यार्थ्यांना जेव्हा निकाल जाहीर केला जाईल तेव्हा बोर्डाच्या अधिकृत सुत्रांकडून माहिती दिली जाईल. तेव्हा ऑनलाईन निकाल cbseresults.nic.in, results.nic.in,cbse.nic.in वर पाहता येणार आहे. सध्या कोरोना संंकट पाहता आता आगामी वर्षात सीबीएसईच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम 30% कमी करण्याची तयारी देखील बोर्डाकडून दाखवण्यात आली  आहे.बोर्डाच्या या निर्णयावर उलटसुलट चर्चा, टीका होत असताना आता शिक्षण राजकारणापासून ठेवण्याचंं आवाहन HRD Minister रमेश पोखरियाल यांनी केलं आहे.