केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) चा दहावी बोर्डाचा निकाल उद्या म्हणजेच 15 जुलै रोजी जाहीर होणार आहे, यासंदर्भात केंद्रीय मंत्री रमेश पोखरीयल (Ramesh Pokhriyal) यांनी ट्विट करून माहिती दिली आहे. उद्या निकाल जाहीर होताच आपण cbseresults.nic.in या अधिकृत वेबसाईटवर आपला रिझल्ट तपासून पाहू शकता. याशिवाय, results.nic.in,cbse.nic.in या वेबसाईट वर सुद्धा रिझल्ट उपलब्ध असेल. याशिवाय आपण आपल्या शाळेतून ऑफलाईन रिझल्ट सुद्धा जाणून घेऊ शकता. तसेच DigiLocker App, DigiResults App, Umang App च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना थेट त्यांची गुणपत्रिका (रिझल्ट) सुद्धा प्राप्त करता येईल यासाठी झोनल ऑफिस मध्ये जाण्याची गरज लागणार नाही.कोरोना व्हायरस (Coronavirus) संकट लक्षात घेता यंदा परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या सरासरी आणि अंतर्गत मूल्यमापन गुणपद्धतीच्या आधारे निकाल जाहीर केला जाणार आहे.
रमेश पोखरियाल यांनी काही वेळापूर्वी ट्विट करून दहावी सीबीएसई च्या विद्यार्थी व पालकांना यासंदर्भात माहिती दिली. मात्र अद्याप त्यांनी वेळ सांगितलेला नाही त्यामुळे विद्यार्थ्यांनी cbseresults.nic.in ही साईट तपासावी. निकाल तपासताना प्रवेशपत्र किंवा हॉल तिकिट जवळ ठेवा कारण रोल नंबर इत्यादी तपशिलांसाठी हे आवश्यक आहे.
रमेश पोखरीयाल ट्विट
My dear Children, Parents, and Teachers, the results of class X CBSE board examinations will be announced tomorrow. I wish all the students best of luck.👍#StayCalm #StaySafe@cbseindia29
— Dr. Ramesh Pokhriyal Nishank (@DrRPNishank) July 14, 2020
दरम्यान, काल सीबीएसई तर्फे बारावी बोर्डाचा निकाल जाहीर करण्यात आला होता. सीबीएसई तर्फे सरासरी आणि अंतर्गत मूल्यमापन गुणपद्धतीच्या आधारे निकाल जाहीर केला गेला होता. यानुसार यंदा 88.78%.निकाल लागला आहे. लवकरच महाराष्ट्र बोर्डाचे दहावी बारावी निकाल समोर येण्याची शक्यता आहे.