CBSE 10th and 12th Exam Date: केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड (सीबीएसई) चे सचिव अनुराग त्रिपाठी यांनी शुक्रवारी 10 वी आणि 12 वी बोर्ड परीक्षा होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे सीबीएसई परीक्षेचे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल असे ही त्यांनी म्हटले आहे. विविध संस्थांनी कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे बोर्डाच्या परीक्षा रद्द किंवा स्थगित करण्यात याव्यात अशी मागणी केली होती. याच दरम्यान त्रिपाठी यांनी हे विधान केले आहे.(SSC, HSC Re-Exam 2020: दहावी, बारावी फेरपरीक्षांना आजपासून सुरुवात; परीक्षार्थींच्या संख्येत घट)
परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आल्यानंतर सीबीएसईच्या अधिकृत वेबसाईटवर ते पाहता येणार आहे. दरम्यान, सीबीएसई परीक्षेसंदर्भात ज्या अफवा पसरवल्या जात होत्या त्याबद्दल आता स्पष्ट झाले आहे. कारण कोरोना व्हायरसची परिस्थिती असली तरीही सीबीएसईच्या दहावी आणि बारावी बोर्डाची परीक्षा पार पडणार आहे.(MHT CET Result 2020 Date Confirmed: एमएचटी सीईटी चा निकाल 'या' दिवशी होणार घोषित, विद्यार्थ्यांना mahacet.org. वर पाहता येणार रिजल्ट)
CBSE exams for class 10 and 12 will happen for sure and a schedule is likely to be announced soon: Board secretary Anurag Tripathi
— Press Trust of India (@PTI_News) November 20, 2020
एएसएसओसीएचएएम तर्फे नॅशनल एज्युकेशन पॉलिसीवर आयोजित करण्यात आलेल्या एका वेबिनार मध्ये बोलताना सीबीएसई सेक्रेटरी अनुराग त्रिपाठी यांनी याबद्दल माहिती दिली आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, परीक्षा नक्की होणार आहेत. त्याचसोबत त्याचे वेळापत्रक लवकरच जाहीर होईल. मात्र परीक्षा कोणत्या पॅटर्नमध्ये पार पडणार याबद्दल त्यांनी स्पष्ट केलेले नाही. तसेच सीबीएसई परीक्षा कोणत्या पद्धतीने घेतल्या जातील याबद्दल विचार करत आहे.
दरम्यान, कोरोना व्हायरसमुळे मार्च महिन्यापासून क्लासेस बंद आहेत. ऐवढेच नाही तर परीक्षेसंदर्भात सुद्धा काही बदलाव करण्यात आले होते. याआधी परीक्षा स्थगित करण्यात आल्या आणि त्यानंतर परिस्थिती अधिक बिघडल्याने काही विषयांच्या परीक्षा रद्द कराव्य लागल्या. याच कारणास्तव विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेसंदर्भात ज्या काही शंका होत्या त्या आज दूर झाल्या असतील.