Tamil Nadu: तामिळनाडूच्या (Tamil Nadu) दिंडीगुल (Dindigul) मध्ये एका सरकारी कर्मचाऱ्याकडून 20 लाख रुपयांची लाच (Bribe) घेताना अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) अधिकाऱ्याला अटक करण्यात आली. राज्य दक्षता आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना अटक केली. अंकित तिवारी (Ankit Tiwari) असे या अधिकाऱ्याचे नाव असून, त्याला 15 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याच्या अटकेनंतर, दिंडीगुल जिल्हा दक्षता आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (DVAC) ईडीच्या मदुराई कार्यालयात झडती घेतली. अधिकाऱ्यांनी अंकित तिवारीच्या निवासस्थानाचीही अधिकाऱ्यांनी झडती घेतली.
मदुराई आणि चेन्नईतील आणखी अधिकारी या प्रकरणाचा तपास करत आहेत. अंकित तिवारी अनेकांना ब्लॅकमेल करत होता आणि त्यांच्याकडून करोडोंची लाच घेत होता. तो इतर ईडी अधिकाऱ्यांनाही लाच देत होता, असेही सूत्रांनी सांगितले. (हेही वाचा -Bribe For Query Case: प्रश्नासाठी पैश्याप्रकरणी सीबीआयने महुआ मोईत्राविरुद्ध तपास सुरू केला)
अंकित तिवारीकडून काही कागदपत्रेही जप्त करण्यात आली आहेत. या प्रकरणाच्या संदर्भात मदुराई आणि चेन्नईच्या कार्यालयात ईडीच्या आणखी अधिका-यांचा तपास करण्यात येत आहे. 29 ऑक्टोबर रोजी अंकित तिवारीने दिंडीगुलमधील एका सरकारी कर्मचाऱ्याशी त्याच्या विरुद्धच्या DVAC खटल्याच्या संदर्भात संपर्क साधला होता, जो बंद करण्यात आला होता. त्यांनी कर्मचाऱ्याला सांगितले की, पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) ईडीला या प्रकरणाची चौकशी करण्यास सांगितले आहे. (वाचा - High Court On Rs 100 Bribe: 2007 मध्ये लाच म्हणून घेतलेली 100 रुपयांची रक्कम खूपच कमी, हायकोर्टाकडून वैद्यकीय अधिकाऱ्याची निर्दोष मुक्तता)
दरम्यान, अंकित तिवारीने कर्मचाऱ्याला पुढील तपासासाठी 30 ऑक्टोबरला मदुराई येथील ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगितले. ज्या दिवशी कर्मचारी कार्यालयात आला, त्यादिवशी ईडीच्या अधिकाऱ्याने तपास बंद करण्यासाठी त्याच्याकडून 3 कोटी रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. त्याने नंतर कर्मचाऱ्याला सांगितले की आपण वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोललो असून लाच कमी करून 51 लाख रुपये देण्याचे मान्य केले आहे.
ईडी अधिकाऱ्याने रंगेहात पकडले -
दरम्यान, 1 नोव्हेंबर रोजी सरकारी कर्मचाऱ्याने ईडी अधिकाऱ्याला 20 लाख रुपयांचा पहिला हप्ता दिला. नंतर ईडीच्या अधिकाऱ्याने त्याला संपूर्ण रक्कम भरण्यास सांगितले आणि ही रक्कम उच्च अधिकाऱ्यांमध्ये सामायिक करावी लागेल असे सांगितले. पैसे न दिल्यास सरकारी कर्मचाऱ्याला कठोर कारवाईची धमकीही दिली. अंकित तिवारीच्या मागण्यांवर संशय घेऊन, सरकारी कर्मचाऱ्याने 30 नोव्हेंबर रोजी त्याच्याविरुद्ध DVAC च्या दिंडीगुल युनिटमध्ये तक्रार दाखल केली. प्राथमिक तपासात असे दिसून आले की अंकितने ED अधिकारी म्हणून त्याच्या अधिकारांचा गैरवापर केला. शुक्रवारी अंकित तिवारी याला सरकारी कर्मचाऱ्याकडून 20 लाख रुपयांचा दुसरा हप्ता स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले.