सन 2007 मध्ये लाच म्हणून घेतलेली 100 रुपयांची रक्कम ही त्या काळी अधिक असली तरी आजघडीला खूपच कमी असल्याचे दिसते, असे सांगत मुंबई उच्च न्यायालयाने सरकारी वैद्यकीय अधिकाऱ्याला भ्रष्टाचार आणि लाचखोरी प्रकरणातून निर्दोष मुक्त केले. न्यायमूर्ती जितेंद्र जैन यांच्या एकल खंडपीठाने मंगळवारी हा निर्णय देताान सांगितले की, या प्रकरात स्वीकारली जाणारी लाच ही एक क्षुल्लक बाब मानली जावी. तसेच, वैद्यकीय अधिकाऱ्याला दोषमुक्त करण्याचा ट्रायल कोर्टाचा आदेशही कोर्टाने कायम ठेवला.

काय आहे प्रकरण?

एलटी पिंगळे यांनी 2007 मध्ये महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील पौड येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल शिंदे यांच्यावर त्याच्या पुतण्याने केलेल्या कथित हल्ल्यानंतर झालेल्या जखमा प्रमाणित करण्यासाठी 100 रुपये मागितल्याचा आरोप केला होता. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ होते.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)