संसदेत प्रश्न उपस्थित करण्यासाठी "प्रश्नासाठी लाच" या आरोपांची चौकशी करण्यासाठी सीबीआयने TMC खासदार महुआ मोईत्रा यांच्या विरोधात चौकशी सुरू केली. मनी फॉर हायर प्रकरणात महुआविरुद्ध सीबीआयची तक्रार सुप्रीम कोर्टाचे वकील जय अनंत दोहाद्री यांनी दाखल केली होती. महुआ मोईत्रा यांनी संसदेत प्रश्न विचारण्यासाठी उद्योगपती दर्शन हिरानंदानी यांच्याकडून लाच घेतल्याचा आरोप त्यांनी केला होता. याप्रकरणी भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे तक्रार केली होती.

भारतीय जनता पक्षाचे (BJP) खासदार निशिकांत दुबे यांनी आरोप केला होता की, मोइत्रा यांनी दुबईतील व्यापारी दर्शन हिरानंदानी यांच्यासोबत संसदेचे लॉगिन शेअर केले होते. अदानींवर प्रश्न विचारण्यासाठी हा प्रकार करण्यात आल्याचे आरोप झाले होते. लोकसभेच्या आचार समितीच्या बैठका झाल्या आणि TMC खासदार दोषी आढळले.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)