Dominica's Highest National Honour: डोमिनिका सरकार (Government of Dominica) आपल्या देशाचा सर्वोच्च सन्मान पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना देण्याची घोषणा केली आहे. कोविड-19 महामारीच्या (COVID-19 Pandemic) काळात देशाला मदत केल्याबद्दल आणि दोन्ही देशांमधील संबंध दृढ करण्यासाठी डोमिनिकाने पंतप्रधान मोदींना हा सन्मान देण्याचा निर्णय घेतला.
कोरोना काळातील मदतीसाठी देण्यात येणार सन्मान -
कोरोनाच्या काळात जगभरातील देशांसोबत भारतही या जीवघेण्या विषाणूच्या साथीशी झुंज देत होता. अशा कठीण काळात नरेंद्र मोदी यांनी अनेक मोठे निर्णय घेतले होते. साथीच्या रोगाचा सामना करणाऱ्या इतर देशांना लस वितरीत करणे, हे देखील यात समाविष्ट होते. पीएम मोदींच्या या कामांच्या पार्श्वभूमीवर कॉमनवेल्थ ऑफ डॉमिनिकाने पंतप्रधान मोदींना आपला सर्वोच्च राष्ट्रीय सन्मान देण्याचा निर्णय घेतला आहे. (हेही वाचा -Mumbai Traffic Diversion on Nov 14: पीएम नरेंद्र मोदी यांच्या शिवाजी पार्क वरील प्रचारसभेच्या पार्श्वभूमीवर दादर भागात 14 नोव्हेंबरला वाहतूकीत बदल)
The Commonwealth of Dominica will bestow its highest national award, the Dominica Award of Honour, upon PM Narendra Modi (@narendramodi), in recognition of his contributions to Dominica during the COVID-19 pandemic and his dedication to strengthening the partnership between India… pic.twitter.com/7zNvTCSmfa
— Press Trust of India (@PTI_News) November 14, 2024
डॉमिनिकाला पाठवण्यात आली होती कोरोनाची लस -
प्राप्त माहितीनुसार, 19 ते 21 नोव्हेंबर या कालावधीत जॉर्जटाउन, गयाना येथे होणाऱ्या इंडिया-CARICOM समिटमध्ये डॉमिनिकाच्या अध्यक्षा सिल्व्हानी बर्टन यांच्या हस्ते पंतप्रधान मोदींना हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. फेब्रुवारी 2021 मध्ये पंतप्रधान मोदींनी AstraZeneca COVID-19 लसीचे 70 हजार डोस डॉमिनिकाला पाठवले होते. या लसीमुळे डॉमिनिकाने तेथील नागरिकांचे प्राण वाचवले होते.