Centipede in Tirupati Prasad: आंध्र प्रदेशातील तिरुमला मंदिरातील एका भक्ताने महाप्रसादात किडे आढळल्याचा आरोप केला आहे. वारंगल येथील चंदू या व्यक्तीने तिरुमला मंदिरातील दिले जाणाऱ्या दही भातात किडे असल्याचा दावा करत त्यांनी सोशल मीडियावर या फोटो शेअर केला आहे. या घटनेनंतर तिरुमला मंदिर व्यवस्थापनाने हा आरोप फेटाळला आहे. या घटनेनंतर सर्वत्र चिंता व्यक्त केली जात आहे. कर्मचाऱ्यांनी हे प्रकरण मागे घेण्यासाठी धमकी दिली, असा देखील चंदू यांने आरोप केला आहे. तिरुमला तिरुपती देवस्थानम्स (TTD) ने दाव्यांना हे निराधार आणि खोटे असल्याचे म्हटले आहे. त्यांनी पुढे म्हटले की, दररोज हजारो भक्त येथे दर्शनासाठी आणि प्रसादासाठी येतात. भक्तासांठी ताजं जेवण केलं जात. हा बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. (हेही वाचा-ग्राहकांच्या जीवाशी खेळ! दिल्लीच्या खजुरी चौकातील अग्रवाल स्वीट शॉपमधील मिठाईवर उंदीर धावताना आढळला, व्हिडीओ व्हायरल)
తిరుమలలో అన్నదాన కేంద్రంలో పెరుగు అన్నంలో జెర్రి
టిటిడి మాధవ నిలయం అన్నదాన కేంద్రంలో భోజనం చేస్తున్న భక్తుని ఆకులో జెర్రి.అన్నప్రసాదంలో జెర్రి కనపడటంపై టిటిడి యాజమాన్యాన్ని ప్రశ్నించిన భక్తలు టిటిడి సిబ్బంది నిర్లక్ష్యపు సమాధానం చెప్పడమే కాకుండా మమ్మల్ని వెళ్ళిపోమన్నారు -… pic.twitter.com/KNCG4IyJmy
— ChotaNews (@ChotaNewsTelugu) October 5, 2024