Rat Runs Over Sweets: देशात सध्या नवरात्रीमुळे उत्सवाचे, आनंदाचे, मांगल्याचे वातावरण पाहायला मिळत आहे. अशात मिठाईसारख्या खाद्यपदार्थांची मागणी वाढली आहे. या सणासुदीच्या दिवसात लोक मोठ्या प्रमाणात मिठाई खरेदी करतात. गेल्या काही दिवसांत बाजारातील निकृष्ट दर्जाच्या मिठाईबाबत अनेक उदाहरणे समोर आली आहेत. आता दिल्लीमधून असा एक प्रकार समोर आला आहे. या ठिकाणी खजुरी चौकातील अग्रवाल स्वीट्समध्ये मिठाईवर उंदीर धावताना दिसत आहे. याचा एक व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. 4 ऑक्टोबर रोजी व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये मिठाईच्या ट्रेवरून उंदीर पळताना दिसत आहे. गगनदीप सिंग या पत्रकाराने हे फुटेज शेअर करत प्रशासनाला दुकानावर कडक कारवाई करण्याचे आवाहन केले. व्हिडीओ शेअर करत सिंग म्हणतात, ‘‘काउंटरवर ठेवलेल्या मिठाईमध्ये उंदीर फिरत आहेत, हा लोकांच्या आरोग्याशी मोठा खेळ आहे. असे प्रकार सातत्याने समोर येत आहेत.’ (हेही वाचा: Rats Damaged Ganja: उंदरांना लागलं अमली पदार्थांचे व्यसन! आधी लाखोंची दारू प्यायली, नंतर गटकला कोट्यावधींचा गांजा)
स्वीट शॉपमधील मिठाईवर उंदीर धावताना आढळला-
काउंटर पर लगी मिठाई में चूहें दौड़ लगा रहे हैं, लोगों की सेहत के साथ बड़ा खेल है, लगातार ऐसे मामले सामने आ रहे हैं आखिर प्रशासन कब इन पर सख्त कार्रवाई करेगा? मामला राजधानी दिल्ली के खजूरी चौक अग्रवाल स्वीट्स का बताया जा रहा है pic.twitter.com/AZveLiNbsX
— Gagandeep Singh (@GagandeepNews) October 4, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)