Delhi Rape Case: दोन भावांनी केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार, गुन्ह दाखल, दिल्लीतील घटना
rape | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Delhi Rape Case: दिल्लीत (Delhi) दोन भावांनी अल्पवयीन मुलीवर बलात्कार (Rape) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणात पोलीसांत तक्राक करण्यात आली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहिती नुसार, गुरुवारी दिल्लीतील जनता मजूर कॉलनीतील रहिवासी असलेल्या अल्पवयीन मुलीवर  जाहिद (22) आणि त्याचा भाऊ जुबेर 24, दोघांन्ही बलात्कार केला. पोलीसांनी दोघांवर बलात्कार आणि पोस्को कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला.

पोलीसांत दिलेल्या तक्रारीनुसार, अल्पवयीन मुलीवर दोघांनी लैंगिक अत्याचार केला. अल्पवयीन मुलगी १५ वर्षाची आहे. दोघेंही आरोपी रिक्षाचालक आहे. पीडित मुलीवर समुपदेशन चालू करण्यात आले आहे. रुग्णालयात देखील तीला उपचारासाठी नेण्यात आले आहे. या घटनेमुळे  परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

पोलिस ठाण्यातील उपायुक्त जॉर्ज तिर्की यांनी पुढील तपास सुरु असल्याची माहिती दिली आहे. दिल्लीत गुन्ह्याची मालिका सुरुच आहे, या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.