Cyclone (Photo Credits: Wikimedia Commons)

Sitrang Cyclone Update: बंगालच्या उपसागरातून उठलेले सितरंग वादळ (Sitrang Cyclone) उत्तर आणि ईशान्येकडे वेगाने सरकत आहे. गेल्या 6 तासात हे वादळ ताशी 15 किमी वेगाने पुढे सरकले आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, हे चक्रीवादळ पुढील 12 तासांत आणखी तीव्र होईल आणि त्याची तीव्रताही वाढेल. उद्या सकाळी म्हणजेच मंगळवार 25 ऑक्टोबर रोजी ते बांगलादेश किनारपट्टी ओलांडण्याची शक्यता आहे. परिणामी सोमवार आणि मंगळवारी देशाच्या काही किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

आयएमडीने पुढे म्हटले आहे की, "सितरंग उत्तर-ईशान्य दिशेने सरकत आहे. हे चक्री वादळ तीव्र होण्याची दाट शक्यता आहे. त्यानंतर, ते उत्तर-ईशान्य दिशेने पुढे सरकत राहील. हवामान खात्याने 24-25 ऑक्टोबरला चक्रीवादळ सितरंग संदर्भात एक सूचना जारी केली आहे. यासोबतच पश्चिम बंगालच्या उत्तर आणि दक्षिण 24 परगणा आणि पूर्व मिदनापूर जिल्ह्यात वादळाचा प्रभाव राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. (हेही वाचा - Maharashtra Weather Update: शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! मुंबई, पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून मान्सूनची माघार)

IMD च्या निवेदनात म्हटले आहे की, "पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरावर आणि पूर्व मध्य बंगालच्या उपसागरावर चक्रीवादळ निर्माण झाल्यामुळे मच्छिमारांना 25 ऑक्टोबर 2022 पर्यंत समुद्रात मारेमारी करण्यासाठी जाऊ नये, असा सल्ला देण्यात आला आहे. संभाव्य नुकसानीचा अंदाज वर्तवत विभागाने सांगितले की, खाचखळगे असलेल्या झोपड्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, सोमवारी उत्तर आणि दक्षिण 24 परगणा आणि पूर्व मिदनापूर जिल्ह्यांमध्ये वाऱ्याचा वेग 40-50 किमी प्रतितास ते 90 किमी प्रतितास वेगाने वाहण्याची शक्यता आहे, असे हवामान खात्याने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे. प्रशासनाने दक्षिण 24 परगणा नदीच्या किनारी रक्षण करण्यासाठी नागरी संरक्षण दल तैनात केले आहे. तसेच लोकांना नदीकाठी सुरक्षित ठिकाणी हलवण्याची व्यवस्था देखील केली आहे.